पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
एआरटी औषधं आता काम करत नाहीत, हे कसं ओळखायचं?
  • जर एआरटी औषधं सुरू झाली व सीडी-फोर चाचणीत दिसून आलं, की हा सीडी-फोर आकडा मागच्या आकड्यापेक्षाः (सहा महिन्यांपूर्वीचा सीडी-फोर चाचणीचा आकडा) १०० किंवा त्याहून जास्त कमी झालाय तर कदाचित एआरटी औषधं काम करत नसतील.
  • जर एआरटी औषधं सुरू झाली व सीडी-फोर चाचणीत दिसून आलं, की सीडी-फोरचा आकडा एआरटी सुरू करायच्या वेळच्या सीडी-फोर चाचणीच्या आकड्यापेक्षा कमी झाला आहे, तर समजावं, की एआरटी औषधं काम करत नाहीत.
  • जर एआरटी औषधं सुरू झाल्यावर संधिसाधू आजार (उदा., न्यूमोनिया, क्षयरोग इ.) दिसून आले, तर शक्यता आहे, की एआरटी औषधं काम करत नाहीत.
  • कालांतराने बहुतेकांची एआरटी औषधं निष्क्रिय होतात. एआरटी औषधं जेवढ्या उशिरा निष्क्रिय होतील तेवढं चांगलं. जर ही फर्स्ट लाइनची एआरटी औषधं काम करेनाशी झाली. तर दुसऱ्या (सेकंड) लाइनची एआरटी औषधं सुरू करावी लागतात. एआरटी निष्क्रिय होण्याची ३ महत्त्वाची कारणे आहेत-
  • औषधं घेण्यात दिरंगाई झाली: औषधं दररोज, ठरलेल्या वेळी घेतली नाहीत तर घेत असलेल्या औषधाचा परिणाम होणं बंद होऊ शकत.
  • नैसर्गिकरित्या: काही जणामध्ये काही वर्षांनंतर एचआयव्ही विषाणूमध्ये नैसर्गिकरित्या थोडा बदल होऊ शकतो. तसा झाला तर आपण घेत असलेली एक किंवा अनेक औषधं काम करेनाशी होतात.
  • एचआयव्ही रेझिस्टंट विषाणूची लागण: जर एआरटी चालू असलेल्या एखाद्या क्ष व्यक्तीने जोडीदाराबरोबर बिगर निरोधाचा संबंध केला व त्यातून जोडीदाराला एचआयव्हीची लागण झाली तर जेव्हा जोडीदाराला एआरटी औषधांची जरूर पडेल तेव्हा क्ष व्यक्ती घेत असलेली एआरटी औषधं जोडीदाराने घेऊन त्याचा जोडीदाराला उपयोग होत नाही..

म्हणून एचआयव्हीची लागण झाल्यावर एआरटी औषधं सुरू झाली तरी, निरोधाशिवाय लैंगिक संबंध करू नका.

32