पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रविवारी गावात जाऊन ताईंनी बारक्याला टी-शर्ट आणला.

या घटनेच्या आसपास मध्ये मध्ये तळहाताला व गुडघ्याच्या खाली पायाला मुंग्या येऊ लागल्या. सुरुवातीला ताईंनी दुर्लक्ष केलं, पण हळूहळू मुंग्या वाढत गेल्या. पाय दुखू लागले. इतके की रात्र रात्र झोप येईना. गरम पाण्यात पाय शेकले तरी बरं वाटेना, पायांचं दुखणं कमी व्हावं म्हणून बाम लावला, स्प्रे मारला तरी काही कमी होईना. या गोळ्यांचा तर हा परिणाम नसेल? पण मग तो सुरुवातीला का नाही दिसला? महिनाभर त्यांनी सहन केलं, मग डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलं, की हा एआरटी औषधातील स्टॅव्हुडिन औषधाचा परिणाम आहे. डॉक्टर मॅडमनी औषधं बदलून दयायचं ठरवलं. अॅनिमिया नाही याची खात्री करून स्टॅव्हुडिनच्या जागी फर्स्ट लाइन औषधांमधलंच झिडोव्हुडिन औषध दिलं.  

औषधं बदलून दिल्यावर पायाच्या मुंग्या हळूहळू कमी झाल्या. पूर्ण गेल्या असं नाही, पण कमी झाल्या.  

परत गाडा नियमितपणे सुरू झाला. बारक्याची शाळा, क्लास, वर्कशॉप, ताईंचं घरचं व बाहेरचं काम व सकाळ-संध्याकाळ गोळ्या घेणं.  

संध्याकाळची वेळ. ताईंनी देवाला दिवा लावला. कुकर ठेवला. बातम्यांची वेळ झाली. टीव्ही लावला आणि गोळी घेणार तेवढ्यात शेजारीण दारापाशी आली. शेजारीण म्हणाली, "कळलं का? तो पलीकडच्या गल्लीतला सम्या..." ताई तिथेच थिजल्या, मग सहज विचारल्यासारखं म्हणाल्या, "काय झालं?" "गेला की" ताईंना त्याचा अर्थ नीट कळला होता. पोटात गोळा आला पण तरी न कळल्यासारखं म्हणाल्या, "कुठं?" "आहो वारला" "कसा काय?" "काय माहीत. कोणी काय सांगतंय तर कोणी काय सांगतंय. 301