या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पहिल्या लाइनमधील औषधं | ||
एनआरटीआय (NRTI) | एनआरटीआय (NRTI) | एनएनआरटीआय (NNRTI) |
झिडोवुडिन (Z) किंवा टेनोफोविर (T) किंवा स्टॅव्हुडिन (S) | लॅमिवुडिन (L) | नेव्हिॉपिन (N) किंवा इफाव्हिरेंझ (E) |
वरील औषधांमधील काहींची निवड करून औषधं सुरू केली जातात. ही निवड खालीलपैकी असते. (1) झेड एल-एन (Z+L+N) किंवा (II) झेड एल+ई (Z+L+E) किंवा (iii) टी+एल एन (T+L+N) किंवा (IV) टी+एल+ई (T+L+E) | ||
• एचआयव्ही संसर्गित व्यक्तीला अॅनिमिया (रक्तक्षय) नसेल (त्याच्या रक्तातील हिमोग्लोबिन ९% पेक्षा जास्त असेल) आणि त्या रुग्णाला क्षयरोग नसेल तर 'Z+L+N' ही औषधं दिली जातात. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीला जर अॅनिमिया (रक्तक्षय) नसेल पण त्या रुग्णाला क्षयरोग असेल तर'Z+L+E' ही औषधं दिली जातात. • एचआयव्ही संसर्गित व्यक्तीला अॅनिमिया (रक्तक्षय) असेल पण त्या रुग्णाला क्षयरोग नसेल तर 'T+L+N' ही औषधं दिली जातात. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीला जर अॅनिमिया (रक्तक्षय) असेल व त्या रुग्णाला क्षयरोगही असेल तर 'T+L+E' ही औषधं दिली जातात. क्षयरोग असेल तर डॉट्सची औषधं किमान १५ दिवस घेतल्याशिवाय एआरटी औषधं सुरू करत नाहीत. टीपणी : अॅनेमिया दिसून आला तर पूर्वी स्टॅव्हुडिन देत. पण स्टॅव्हुडिनचे दुष्परिणाम गंभीर असल्यामुळे त्याच्या जागी आता टेनोफोविर गोळी देण्यात येते. |