पान:संगीत शिवलीलामृत.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. अध्याय ८ वा. श्लोक ( पृथ्वीवृत्त.) उमापति शशीधरा किति तरी तुला प्रार्थे मी ।। दयोदधि तुझा कसा सकळ जाहला तो कमी ॥ तुझे चरण पाहण्या बहुत मी असे घावरा ।। कृपा करुनि शंकरा झडकरी मला उद्वरा ॥ १ ॥ . साको. षष्ठाध्यायीं शिव कवचचि तें लेऊ शिकवी बाळा ।। मृत्युंजयाचे तो मंत्र ह्मणूनो भस्म चार्च अंगाला !! त्यावरि शिवयोगी ॥ दे वस्तू बाळालागो ॥ १ ॥ एक शंख मग दिधला त्याने मूछित शत्रू नादें ।। त्रिभुवनांतही ज्या सम नाहों ऐसें खड्गचि तो दें । पाहुाने खड्गाला ॥ शत्रू पंडतिल धरणीला ॥ २ ॥ द्वादश सहस्र इभवळ बाळा होइल प्राप्ताचे तुजला ।। आयुरारोग्य होउनि तुजला विजयी होशिल बाळा ।। पाळी मेदिनि ही ॥ जाइल किर्ती त्रिभुवनिं ही ॥ ३ ॥ भाग्यलक्ष्मि तव सदानं वसावी मायालक्ष्मी हृदयीं ॥ दानलक्ष्मि करकमळी राहो सौम्यलक्ष्मी ही देहीं । वीरश्री दंडी ॥ शत्रुस काळासम दंडी ॥ ४ ॥ . शत्रूलक्ष्मी खगिं वसो ती सामराज्य तें विलसो ॥ विद्यालक्ष्मी सर्व काळ ही कमळासम ती विकसो ।। सांगुनि त्या ऐसें ।। योगी गुप्तचि झालासे ॥ ५॥ . आर्या. भद्रायु पिता होता, वज्रबाहु दशार्ण देशिचा राणा ॥ ज्याने कांता त्यजिली, घोर वनीं तोच हा तरी जाणा ॥१॥