पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय आठवा. मागधेश हेमरथ हि, तेव्हां युद्धार्थ पातला वेगें ॥ नागवि देशहि सगळा, आला राजास जिंकण्या रागें ॥ २ ॥ वज्रबाहु ते समयीं, वार्ता ऐकूनि शीघ्र धांवे तो ॥ दशदीन भूप लढले. झाला विपरीत फार शेवट तो ॥ ३ ॥ जित धरुनि वज्रबाहू, शत्रू नेतीच बांधुनी त्याला ॥ राजस्त्रियाहि धरिल्या, शत्रूला तोष तो बहू झाला ॥४॥ साकी. जिवंत धारला वज्रबाहु तो रथीं घालुनी चाले ।। राजस्त्रियाही प्रधान सारे बंदिवान ते केले ॥ वज्रबाहु बोले ॥ कैसें संकट हे आलें ॥ १ ॥ दिंडी. पुत्र बंधू वा कोणि नसे त्राता ॥ कोण मजला हो सोडवील आतां ॥ वाट कोणाची पाहुं तरी देवा ॥ दास तुमचा संकटी त्वरित धांवा ॥ १ ॥ पद. ( झाली ज्याची उपवर, ) या चालीवर. वार्ता कळली भद्रायूला ॥ शत्रू नेती धरुनि पित्याला || धृ० ॥ . स्मरुनि मनी मग गुरु चरणाला ॥ अंगी लेई शिव कवचाला ॥ भस्म मंत्रुनी अंगाला तें ॥ लावुनि घेई कार खड्गाला ॥ जननी चरणीं मस्तक ठेवी ॥ बोले शत्रू नेति पित्याला ॥ गुरू दास मी तूझा सुत जरि ॥ जिकिन साऱ्या आर वर्गाला ॥ आणिन ह्या तव चरणा पाशी ॥ आज्ञा देई लवकर मजला ॥ तुझ्या कृपेने काळासी मी ॥ युद्ध करूनी दंडिन त्याला || शरत्कालिच्या शशि सम माते ॥ मिळविन आतां धवल यशाला ।। मातेच्या तो चरणीं माथा ॥ ठेवुनि मग तो निघतां झाला ॥ १ ॥