पान:संगीत शिवलीलामृत.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सातवा. साकी. या या परिने शिव योगी तो बोधचि करितां झाला ॥ हा बोध जे नित्य ऐकती तेच जिंकिती कलिला ॥ तया न्यून न कांहीं ॥ सदां शंभू उभा राही ॥ १ ॥ हा अध्याय गिरि कैलासचि यावरि शंभू राहे ॥ पारायण तरि नित्य करूनी प्रचीत याची पाहे ॥ चिंतित तें पुरती ॥ सकळ जगी धन्यचि होती ॥ २॥ अध्याय तरी हिमाचलचि हा भक्ति भवानी कन्या ।। पयः फेन तो वरूनि तिजला करितां झाला धन्या ।। श्वशुर गृहीं राही ॥ भक्तीने अनुभव पाही ॥ ३ !! ____ अंजनीगीत. पंढरिनाथा भवभय भंगा ॥ तूं तरि धरशी मस्तकिं लिंगा ।। कमती माझी जाउनि भंगा ।। सुमती ती व्हावी ॥१॥ पद. ( कृपाघन भक्तों आकळिला, ) या चालीयर. महेश्वरा कोठे तरी रमला ॥ अहर्निशी मी ध्यातों तुजला ॥ ५० ॥ भवनदि मजला बुडवू पाहे ।। तारूं होउनि तारी मजला ॥ धांव धांव तूं गिरेजारमणा ।। दास तुझा हा संकटिं बुडला ॥ हीन दीन मी भक्त तुझारे ।। ह्मणुनी कां तूं त्यागिसि मजला || हीनपणा हा काहुनि टाकी ।। बलवंता मी शरणचि तुजला ॥१॥