पान:संगीत शिवलीलामृत.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. आपत्कालीं धैर्य धरीरे ॥ वादी जयवंत वैखरीरे । युद्धी दाखिव शरपणारे ॥ याचक तृप्त करी ॥ २ ॥ पद. ( गजानना दे दर्शन सत्वर, ) या चालीवर. आतजनासह भोजन करणे ॥ उत्तम भोजन त्यासचि ह्मणणें ॥ वाजि गजासह वाट चालणें ॥ श्रेष्ठ पंथ तो होय ॥ ज्या लिंगाचे नाही पूजन ।। पूजी त्याला तेथे जाउन ॥ अनाथ प्रेता नयनी पाहून ॥ संस्कार त्या देणें ॥ ब्रह्मद्वेष तो करूं नको बा ॥ काळकट तें वीष असें बा ॥ सत्समागम नित्य करी बा ॥ सुधारस तुच्छ तो ॥ १ ॥ अभंग प्रताप तुझा तो गेला दूर जरी ॥ गर्व नको तरी मनीं आणूं ।। आनंद मनीं तो सदां वसो तुझ्या ।। चित्त बोला माझ्या तुवां द्यावें ।। पराची सुवार्ता ऐकुनि जो सुखी ।। सर्वांच्या तो मुखीं भला भला ॥ पाषाणाची रने व्यर्थ ती रे बाळा ।। कारण कलहाला कली मध्ये ।। अन्नोदक दोन सुभाषित एक ।। औदार्य तें चोख रत्न जाणी ।। कोणाचेही वर्म न यावे वदनीं ।। सदा शिवभजनी काळ जावा ॥ जरी भाग्य आले अमूप तुजला ॥ स्वधर्म आपला सोडूं नको ॥ मनीं नको आणूं विरोधी पूर्वीचा ॥ पार विश्वास तयाचा धरूं नको ॥ गर्भिणी जसारे पाळि ती गर्भाला ।। तेंवी तुं प्रजेला सदा रक्षी ॥ गुरू आणि शंभू असे एक मानी । भेद नको मनी आणूं दुजा ॥ उत्तम स्वरूप नराची ती शोभा ॥ स्वरूपाची शोभा सद्गुण तो ॥ अलंकार गुणाचा असें तो रे ज्ञान ॥ ज्ञानाचे भूषण क्षमा शांती ॥ कूल शिल विद्या धन राज्य तप ॥. यौवन वा रूप मद आठ ॥ अष्टमदें तूं बा भुलो नको मनी ॥ बलवंत करणी मनी ठेवी ॥१॥