पान:संगीत शिवलीलामृत.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सातवा. बंधु. सोयरे श्वशुर आप्तही ।। यास मितचि तूं दावि स्नेहही ॥ दृष्टि में पडें लोभ त्यावरी ॥ दाखवू नको फार तूं तरी ॥ १ ॥ दिंडी. कंठि घाली रुद्राक्ष सदोदीत ॥ नको सोइं शिव भजन संकटांत ॥ शिवकवच ते सर्वही त्यास सांगे ॥ भस्म मंनि बालास लावि वेगें ॥१॥ नित्य जप हा मंत्र तं मुखीं बाळा ॥ तला पाहनि भाति ये कळीकाळा ।। आततायी ब्रह्मन यास मारी ॥ दुष्टलोकांना नको देउं थोरी ॥ २ ॥ __ साकी. सोमवार शिवरात्र प्रदोषहि प्रेमें आचरि बाळा ॥ शिवहरि कीर्तन निदाचे तें नको देउं त्या टाळा ॥ श्रवणचि करण्याला || करिल दूर भवपाशाला ॥ १ ॥ महापर्विं वा कुयोगदिनी वा श्राद्ध दिनीं व्यतिपातीं ॥ संक्रमणी वा वैधृतीला मैथुन जे जे करिती ॥ जाती नरकाला ॥ नाहीं मुक्ती मग त्याला ॥ २ ॥ सत्पात्रीं तें दानचि द्यावें अपानि नच तूं देई ॥ अपात्रीं तरी दान दिल्याने दरिद्र खचितचि येई ॥ गुरुमुखें श्रवण करी ॥ शास्त्र पुराण कीर्तन तरी ३ ॥ पूज्यांचा अपमान करूनी अपूज्य त्यांचा मान । ऐसें करितां दुर्भिक्ष भयहि अथवा येइल मरण । स्पर्धा बलवंता || करतां ते द्वार अनर्था ।। ४ ॥ दानें शोभे हस्त सदां तो कंकण मुद्रा भार ॥ पुराण श्रवणे श्रोत्र धन्यचि नलगे कुंडल थोर ।। देइन वा नाहीं ॥ एक बोल असो सदाही ॥ ५ ॥ अंजनीगीत. प्रेमळ वाणी सदां जयाची ॥ भार्या सुंदर कुलिन चालिची ॥ वसते इच्छा औदार्याची ॥ तोच जगी धन्य ॥ १ ॥