पान:संगीत शिवलीलामृत.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सातवा... नी पाळित जाई ॥ सर्वभूतीं शिव ,तो पाही ॥ स्वधर्म आपुला तूं सहसाही ॥ सोडुं नको बा संकट समयीं ॥ तोच तुझा रे बंधु सखाही | विचार केल्या वांचुनि तूरे ॥ आणक्रिया ती करूं नकोरे ।। मागे पुढेही पाहानि बारे ॥ शब्द बोल तूं कुशलपणेरे ॥ काळ कोण हा मित्र कितारे ॥ कोण द्वेषी शत्रु कितिरे ॥ आय काय तो खर्च कितीरे ॥ स्वबळ किती हे आधिं पाहिरे ॥ कसें वर्तती सेवक सारे ॥ देतिल यश वा अपेश ते रे ॥ याचा मानि तूं विचार करिरे॥ देव अतिथी वेद मित्र ते ॥ स्वामी विद्या अग्निहोत्र तें ॥ पशू कृषि धन आप्त बंधु ते ॥ पत्नी बालक अरि दासाते ॥ गृह वाताही दुष्ट रोग ते ॥ उपेक्षू नको बा इतक्यांतें ॥करतिल ते बा हानी तूंते ॥ साधू संता भोजन देई । अशिर्वाद बा त्यांचा घेई ॥ १ ॥ पद. (भला जन्म हा,) या चालीवर ज्या पंथे ते बुधजन गेले तोच मार्गरे खरा ।। माता पिता यतिनिंदा न करा ॥ वैश्वदेवही करतांना जर अतिथी येई घरा ॥ नको पुसूं याती त्या नरावरा ॥ अन्नवस्त्र तें सर्वाभूती देउनि साधी हरा ॥ आत्मा शिव मनीं समज धरा ॥ परोपकार तो निय करावा परपीडा नच करा CHAINA गोब्राह्मण रक्षण मानं धरा ॥ निंदा वाद तो करूं नकोबा शिवहरा नित्य स्मरा ।। तो तुह्मां नेइल पैल तिरा ॥ परधन दारा वमन समजुनी पाहुनको चातुरा॥ शास्त्रश्रवण विचार तो तारे करा ॥ स्नान होम जप अध्ययनाचे पंच यज्ञ नित्य करा।। तेथे आळस नको बा जरा ॥ सूरत निद्रा भोजन करण्या नियमित पण तें धरा ।। दान कराया उशीर नच करा ॥ चाल ॥ सार्वजनिक सेवालय खेड, (पुणे.)