पान:संगीत शिवलीलामृत.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. श्लोक पद्माकराला सुख होय भारी ॥ बाई तुझी मी किति सांगु थोरी ॥ तुझे प्रतापें मज लाभ झाला ॥ प्रत्यक्ष योगीजन देखियेला ॥१॥ आयी पद्माकरास झाले, बहु सुख पाहूनि सुमतिच्या बाळा ॥ स्वसुत सुनयाहुनि ही, भद्रायू फार आवडे त्याला ॥१॥ श्लोक दोघाला ही करित मग तो मेखला बंधनाते ॥ वेचूनी ही अमित धन तें भूषणे घेइ त्यातें ॥ केले दोघा निपुण मग हो सर्व विद्येत त्याने ॥ दोघे होते सम समाच ते बुद्धिन वा वयानें ॥ १ ॥ भद्रायते सरलिं मग ती वर्ष बाराहि पूर्ण ॥ मातेची हो बहुतचि तरी नित्य सेवा जपून ॥ दोघांनीही किति तरि ह्मणूं पुण्य हो पूर्व केलें ॥ आला योगी पुनरपि तिथे पाहतां नम्र झाले ॥ २ ॥ साको नयनाश्रूनें चरण क्षालुनी केशावसने पुसिलें ॥ स्नेह सुगंधित अंगा लावुनि योगी पूजन केलें ॥ वारंवार नमिती ॥ शिव शिव शिव शिव मुखि ह्मणती ॥१॥ तुझ्या प्रतापे करुनी देवा पुत्रवती मी झाले ॥ दीना नाथा पदार घेउनी धन्य तुवा रे केलें ॥ त्यावरि तो योगी ॥ नीती बाळा प्रति सांगी ॥ २ ॥ कटाव श्रुतिस्मृति पुराणोक्त पाही । धर्मनीति तूं वर्तत जाई ॥ माता पिताही गुरु- च्या पायीं ॥ सदा ठेवि निष्टा हृदयीं ॥ गोब्राह्मण प्रजाजनाही ॥ प्रेमेकरु-