पान:संगीत शिवलीलामृत.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सातवा.. साकी. व्रण व्यथा ती निरसुनि जाउनि बत्तिस लक्षणि झाला || सुमतीचा तो बाळक तेव्हां विस्मय वाटे सकळां ॥ . परिसें त्या लोहा ॥ तैसें तेजचि त्या देहा ॥ १ ॥ धन्य गुरू तूं धन्य मंत्र हा पद्माकर तो बोले ॥ काळ मृत्युच्या भया पासुनी दूर तुवां बा केले ॥ रत जे गुरु चरणीं ॥ काळहि जिकिला त्यांणी ।। २ ।। गुरू पदांबुजि बाळ घालुनी सुमती लागे चरणीं ।। .. सद्गुरु राया शरीर मम हे ओवाळिन तुज वरुनी ॥ .. धन्य तुवां केलें ॥ निपत्रिक नांव हे गेलें ॥ ३ ॥ या शरिराच्या करूनि पादका जरि घालिन या चरणीं ॥ उपकाराची फेड तरी बा नच होई मज कडुनी ॥ थोर तुली देवा ॥ दासीने किति गुण गावा ॥ ४ ॥ दिंडी बहुत दिन हा वांचेल तनय बाई ॥ रोग नासुनि ऐश्वर्य फार येई ॥ सकळ पृथ्वाचे कारेल राज्य बाळ ॥ प्रतापाला दचकेल बघुनि काळ ॥ १ ॥ पद. ( शक्ति का होशी, ) या चालीवर. पावे राज्याला ॥ पुढती हा ॥ धृ०॥ भद्रायू हे नाम ठेविलें सुमती तव बाळाला ॥ भद्रायू हा थोर होइ तव येथे क्रमि काळाला ॥ मंत्र जपाचा विसर न व्हावा करि धरुनी निष्ठेला ॥ राजपुत्र हा कळवू नको तूं इतक्यांताच लोकाला || चवदा विद्या सर्व कला ही येतिल तव पुत्राला || .. आशिर्वाद तो देउनि: ऐसा योगी गुप्ताचे झाला ॥१॥