पान:संगीत शिवलीलामृत.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. पद. . . ( भला जन्म हा तुला लाधला, ) या चालीवर. मायामय ह्या प्रपंच वृक्षी जिव शिव द्विज बैसती ॥ . पहा गे कसी तयाची रिती ।। शिव सावधान सर्व साक्षि तो जिव भाक्षे विषय फळें ॥ त्यांतच मग मन तें गुंतलें ॥ आपण आपणा विसरुनि गेला भ्रमला मग अंतरीं ॥ जन्म मरण भोगितसे वर वरी ॥ एखादा जो पुण्यवान् तो शरण जाइ गुरु प्रती ॥ त्याचे गर्भवास मग चुकती ॥ शिवरूपी तो होउनि राही 'जा शरण गुरु प्रती ।। तोच गे देइल तुज ती गती ॥ १ ॥ साकी. ऐकतांच तें दिव्य निरूपण पद्माकर वा सुमती ।। सद्दीत ते होउनि उठती चरण तयाचे नमिती ।। कोण गुरू दुसरा || पाहूं तरी मी ईश्वरा ॥ १ ॥ देवा ! दासी संकटिं पाहुनि धांव घेतली तुह्मीं ॥ संकट माझें दूर करावें चरणी लीनचि आह्मीं ॥ नयनों जळ ढाळी ॥ चरण नमी वेळोवेळी ॥ २ ॥ - आयी मृत्युंजय मंत्राचा, केला उपदेश तो तिच्या कानी ॥ भस्म चार्चेतां अंगीं, झाली हो दिव्य रूप तो राणी ॥ १ ॥ मंत्रित भस्म करूनी, बाळक शरिरास लावि सुमती ती ॥ ते क्षाणं बाळक उठले, बाळाची झांलि फर सुमती ती ॥ २ ॥