पान:संगीत शिवलीलामृत.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सातवा. पापाचा हा समुद्र सुमती ॥ भ्रांती अंबर तरी ॥ मुत्र श्लेष्म हाडें मास रक्तची ॥ चर्म वेष्टित वरी ॥ मातृ विटाळ वा पितृ रेतची ॥ वसती या शरिरी ।। अपवित्र असें शरिर मुळी हे ॥ पशुमुत्र शुद्ध करी ॥ सुरें जरि तें मुंडन केलें ॥ पावन का हो तरी ॥ १ ॥ साकी. देशिका प्रती शरण न रिघतां कैसे प्राणी तरती ॥ कल्प कोटि ते फेरे घेती मुक्त कधी नच होती ॥ ह्मणुनि शरण जावें ॥ सुंदरी तूं मनोभावें ॥ १ ॥ जन्म जन्मीचे पती तुझे ते कोठे वसती सांगे ॥ अवघा हा गे माया पुर तरी सावध होई वेगें ॥ ज्याचे हे लेणें ॥ देत घेत लाजिरवाणे ।। २ ।। तनघर केले त्रिगुणे सुमती पांच वासे आणुनी ॥ याचा काही नसे भरवसा केव्हां जाइल जळुनी ॥ जीर्ण वस्त्रचि तें ॥ ऋणानुबंध तोंवरि टिकतें ॥ ३ ॥ जैसें मगजळ मिथ्या किंवा राज्य स्वप्निचे मिथ्या ॥ तैसा प्रपंच असुनी प्राणी मनिं नच जाणति तथ्या ॥ पापी प्राणी ते ॥ धन धान्य इच्छिति हो, ते ॥४॥ दिडी. नदी मध्ये काष्टहि एक होती ॥ मागुती ती वाहुनी दूर जातीं ॥ स्त्री पुरुष तरी तसे जोण बाई ॥ प्रपंचाचा खेळ हा तसा होई ॥ १॥ तरू वरती ते पक्षि वैसताती ॥ किती बसती गे किती उडन जाती ॥ दुज्या तरुवर मागुती बैसताती ॥ अपत्ये ही तैशीच जाण चित्तीं ॥ २ ॥ वृक्ष छाये बैसती प्रवासी मे ॥ उष्ण सरलिया जाति मार्गि ते गे॥ आप्त बंधू सोयरे तसे जाणी ॥ आण सुमती हे सर्व तरी ध्यानीं ॥३॥