पान:संगीत शिवलीलामृत.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. . देहा करितां शोक कारीसे तूं आहे हा पडला ।। बंधुसुतादिक नाते काही नाहीं आत्म्याला ॥ १॥ पद. (दिसली पुनरपि, ) या चालीवर. सुमती ऐके अवघे जन हे माया मोहें बहु फसती ॥ जळी उठति बहु तरंग बाई क्षणभंगुर ते पार असती । मृगजल सारें मिथ्या असुनी बुद्बुद सत्य कसे होती ।। चित्रों तरुची छाया पाहानि तेथे कोणी नच वसती ॥ चिंताग्नीने सदन जाळिलें ऐसे होइल कां सुमती ॥ चित्रांतिल त्या गंगेमधुनी वाहुन कोणी नच जाती ॥ वंध्या सुत तो द्रव्य आणुनी मारुतिला दे भीष्म सुता ती ।। गंधवोच्या नगरीहुनि कां लग्न कराया जन येती ॥ वाऱ्याचा तो मंडप सजवुनी सिकता दोरें कां कसती ॥ सत्यत्वाचा लेश न या माधं तैसा प्रपंच गे सुमती ॥ १ ॥ पद. (संग घडो मज दंग असो ) या चालीवर शुक्ति रुप्याचे पात्र करूनी खपुष्प कोणी नच भारती गे ॥ धृ०॥ कांसविचें घृत घालुनि वाती मृगजाल मीन न पाजळती गे ॥ रंभेचा तो नाच पहाया जन्मांध कशाला जाई गे ॥ अही कर्णिची कुंडल सारी चित्रीं चोर नच आणती गे॥ सुमती सांगे यांत खरें किती तैसा प्रपंच तरि जाणी गे ॥१॥ पद. (अशाश्वत संग्रह कोण करी, ) या चालीवर. अशाश्वत सर्व हि जाण तरी ॥ ४० ॥ त्याचा मग कां शोक करशी तूं ॥ विचार कार क्षणभरी ।। क्लेश तरूचे स्थान शरीर हे ॥ रोग सकळ त्यावरी ॥ कृमि कटिक ते गृहची करिती ॥ सदोदित या शारीरीं ॥