पान:संगीत शिवलीलामृत.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. अध्याय सातवा. आर्या ऐसे होतां होता, होइ व्यथा तीच फार हो कठिण ॥ सुमति तनय तो तेव्हां, व्याकुळ होऊनि पावला निधन ॥ १ ॥ सुमती शोक करी बहु, त्या शोकास कोठुनी असे पार ॥ ह्मणे मम रत्न गेलें, पद्माकर शांतवी तिला फार ॥ २ ॥ निशांतिं गभस्ति उगवे, तैसा शिव योगि तो तिथे प्रगटे ।। जैसे की भणगाला, चिंतामणि साच तो तरी वाटे ॥ ३ ॥ धांवत धावत जाऊनि, पद्माकर धरि चरण शिवाचे हो ॥ दिव्यासनिं मग बसवी, पूजुनि शिव नाम घेत वाचें हो ॥ ४ ॥ त्यावरि शिव योगी तो, सुमति प्रात सांगि हो निरूपण तें ॥ निरूपण तें तरि तुह्मी, ऐका देऊनि आवधानाते ॥ ५ ॥ पद. . (शिवाज्ञेचि वाट न पाहतां,) या चालीवर. ऐके सुमती कांहो रडसी सांग तरी मजला ॥ पूर्व जन्म ते पती पुत्र ही होते कां तुजला ॥ तं तरि कोठे ते तार कोठे गेले जन्माला ॥ चौांश लक्ष योनी मध्ये पाहसि आप्ताला ॥ मूल कुणाचें कां तरि रडशी करी विचाराला ॥ ज्या ज्या वर्णी शरिरा धरिती करिती गर्वाला ॥ उप्तत्ती ही कसी जाहली देह कसा झाला ॥ न पाहती ते विचार करुनी भ्रमती मायेला ॥ त्वां पुत्र हा कोठुनि आणिला कोठे तरि गेला ॥ . अवघे जन हे जातिल कोठे पुनरपि जन्माला ॥ आत्मा शिव हा शाश्वत आहे नाश नसे त्याला ॥ चाल ॥ शरीर हे समजे क्षणभंगुर अंतार ॥ शोक तूं कशाला करसी मग सुंदरी ॥ आत्मा अविनाशी नव्हे कुणाचा तरी || चाल ॥ ..