पान:संगीत शिवलीलामृत.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. कामदा. ( या चालीवर.) शोक ऐकुनी सुमतिचा तरी ॥ पक्षिगणहि तो शोक हो करी ॥ धराण C पडे ग्लानि येउनी ॥ करिति सावली पंख पसरुनी ॥१॥ चंचु भरुनि तें पाणि आणती ॥ थंड व्हावया देहिं शिंपती ॥ बाळकास ते बहुत सुखविती ॥ मधुरसास ते अणुनि पाजिती ॥ २ ॥ " साकी. वन गाई त्या निज पुच्छानें वारा घालिति रजनी ॥ अपूर्व नवलहि घडून आले हिंडत असतां रानी ॥ कांहीं ग्रह फिरले ॥ ह्मणुनी नवलचि ते घडलें ॥१॥ वृषभ भार तो बणिक घेउनी मार्गी जातां पाही ॥ त्यांच्या संगें वैश्य पत्तना जाती झाली ती ही ॥ तेथें नृप होता ॥ पद्माकर तो बहु ज्ञाता ॥ २॥ दिंडी. कोण तूंगे आलीस कशी येथे ॥ विदित कर ते सर्व ही तूंचि मातें ॥ मुळापासुन सर्व ही सांगि त्यातें ॥ अश्रु नेत्री वाहती ऐकुनी तें ॥१॥ साकी. पहा कर्म हैं कसें हिंडवी अनाथ पार हो इजला ॥ वज्रबाहुची पट्टराणि ही यावी कां ह्या गतिला ॥ होउनि दीन तरी ॥ यावी कां ? मम मंदिरों ॥ १ ॥ धर्माची तूं भगिनी माझी ऐके सुमती बाई ॥ मजला कांहीं न्यून नसें गे स्वस्थ मानसें राही ॥ घेउनि पत्राला ॥ मी सादर तब सेवेला ॥ २ ॥ अगणित वैद्यहि आणुनि नृपती औषध त्यांना देई ॥ दुसरे तिसरे प्रयत्न केले गूण न कांहीं येई ॥ सुमति ह्मणे ताता ॥ श्रीशंकर त्राता आतां ॥ ३ ॥