पान:संगीत शिवलीलामृत.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सातवा. दिंडी. वीष अंगी ते फार भिनुन गेलें ॥ क्षतें पडली त्या देहि व्रणहि आले ॥ बह उपाय ही करी राय त्यास || नाहिं आला परि एक ही गुणास ॥ १ ॥ साकी असह्य पीडा होउनि सुमती शोक करितसे भारी ॥ तिचे बाळ ते सदां रडतसे नपती तो त्रास करी ॥ रथी तिला घाली ॥ सोडी दूराचे त्यावेळी ॥ १ ॥ मनुष्य दर्शन नाही जेथें व्याघ्र सर्प हे वसती ॥ . बाळ कडेवर घेउन हिंडे राणी ती हो समती ।। कंटक ते रुतती ।। वरि वरि मुछित हो पडती ॥ २ ॥ तुषा लागली उदक मिळेना शरीर सारे तिडके ॥ कैलास पती अंतारं ध्याउनि सुमती करुणा भाके ॥ देवा पाव आतां ॥ तुजविण कोणि नसे त्राता ॥ ३ ॥ पद. .. ( देव स्त्री मेनका ) या चालीवर. जगदात्मा तूं जगद्वंद्य तूं प्रार्थि तुला दासी ॥ जयजय शंकर त्रिदोष शमना वससी कैलासी ॥ जगदांकुर तूं कंद तरी तूं भक्तअघां वारिसी ॥ . अनादि सिद्धा अमरनुता तूं माया तुजपाशीं । भक्तजन ते संकटिं पाहुनि धांवुनि तूं येशी ।। विश्वव्यापका जगद्गुरू तूं पाव तरी मजसी ॥१॥ श्लोक. वारे वरी सुमति कार रूदना ॥ पडतसे धरणी वार अंगना ॥ स्वतनया सुमती कार सांवरी ॥ पुनरपी सति मूर्छित हो तरी ॥ १॥