पान:संगीत शिवलीलामृत.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. काय पुण्य तें पूर्व जन्मिचें होतें गणिकेच्या पदरीं ॥ शिवयोगी तो दृष्टि देखुनी धावुनि त्याचे चरण धरी ॥ १ ॥ साकी होउनि सद्गद अंतरिं तेव्हा त्याचे पूजन करिती ॥ बहुविध अन्ने तयार करुनी ऋषीस अर्पण करिती ॥ शेज करुन हाती ॥ निजविंति योगी तो वरती ॥ १ ॥ ऋषि चरणांबुज तळहातें ते दोघे मर्दिति भावें ॥ एक निशीं तो क्रमुनी तेथे अंतरधानचि पावे ॥ . उमारमण गेला ॥ दर्शन देउनि आमांला ॥ २ ॥ मदन पिंगला मृत्यु पावली कांही दिवसांनी हो ॥ शिव योग्याचे पूजन घडलें पदरीं पुण्यचि तें हो ॥ ह्मणुनी दोघाला ॥ उत्तम कुळी जन्म झाला. ॥ १ ॥ दिंडी पिंगला ही भूवरी जन्म घेई ॥ सिमंतिनिची कन्यका तरी होई ॥ कीर्ति मालिनि ठेविलें तिचें नांव ॥ तीच झाली तारण्या कुला नांव ॥ १ ॥ वज्रबाहू नामेंच नृपति होता ॥ सुमती नामें होति हो तया कांता ॥ तिच्या गर्भी जाउनी मदन राही ॥ पुढे कैसी जाहली गोष्ट पाही ॥ २ ॥ दशार्ण देशिचा वज्रबाहु राणा ॥ सुमति त्याची ती पट्टराणि जाणा ॥ सवति होत्या हो तिला फार दुष्ट । गर्भ पाहुनि योजती मनी क्लिष्ट ॥ ३ ॥ कामदा ( या चालीवर.) सुमति गर्भिणी ह्मणुनि ऐकिलें ॥ कपट सवतिनी करुनि दीधलें ॥ वीष ते तिला देति प्यावया ॥ इच्छिती मनी मृत्यु यावया ॥ १॥ वेळ चांगली मृत्यु ना तिला ॥ प्रसुत जाहली रोग लागला ॥ देहि ते तिच्या वीष फूटलें ॥ बाळकास ही तेंच भोवलें ॥२॥