पान:संगीत शिवलीलामृत.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. पनि द्रव्य घट पाहुनि रे ॥ वोसंडुनि जाई दुर रे ॥ . वचनी सत्य सदां जो रे ॥ अवघी विद्या मुखोदूत रे ॥ गर्व ठाउका नसे ज्या रे ॥ भूत दया मनिं ज्याच्या रे ॥ निंदक करिती निंदा रे ॥ परि जो मनी खेद रहित रे ।। । जरि ठाउके परगुह्या रे ॥ वाचेस कधी नाणी रे ॥ स्त्री पुरुष ज्या भान नसें रे ॥ सुकृत तप दान न सांगे रे ॥ पैल मुर्ख हा पंडित रे ॥ न ह्मणे समान पाही रे ॥ अर्थ बुडाला नच खंती रे ॥ परमहंस ज्याची वृत्ती रे ॥१॥ दिंडी. वेद मित्राचा पुत्र असा तोही ॥ धैर्य शस्त्राने मदन जाळि देहीं । ह्मणे मित्रा ग्रामास जाउं आतां ॥ निवेदन ही गोष्ट रे करूं ताता ॥ १ ॥ साकी. सारस्वत सुत आला तेव्हां स्त्रीरूपें सदनाला ॥ गतवर्तमान में जे घडलें केलें श्रुत ताताला ॥ सारस्वत बोले ॥ पहा कर्म कसें फिरलें ॥ १ ॥ सारस्वत तो रडू लागला वक्षस्थळ तें बडवी ॥ राजा जवळी येऊन बोले केली गोष्ट न बरवी ॥ दुष्टा चांडाळा ॥ कैसा घात तुवा केला ॥ २ ॥ एकचि होता बालक मजला निर्वंश कसा केला ।। करितों तुजवर हत्या आतां ऐकुनि नप तो भ्याला ॥ अधोवदन पाही ॥ राजास सुचेना कांहीं ॥ ३ ॥ . . . पद. ( उरला भेद न ज्या कांहीं, ) या चालीवर. कृत्रिम सत्य कसे झालें ॥ देवा कैसें तरि केलें ॥ ५० ॥ बाही सकळ ब्राह्मणांना ॥ जोडुनि हस्त वदे त्यांना ॥.... करा सतेज अनुष्टाना ॥ याला पुरुषत्वाचे आणा ॥....