पान:संगीत शिवलीलामृत.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सातवा. धांवत धांवत येउनि वदला काय मांडिले सोंग ॥ नुही आह्मी गुरु बंधु ना ? हे तरि मजला सांग ॥ ऐसें कां वदसी ॥ माझा अंत कां पाहसी ॥ २ ॥ .. अंजनीगीत. कामिनि तेव्हां तया बोलली । मम अवयव हे बघ या वेळी ॥ पुरुषत्वाची चिन्हें गेलीं ॥ आतां मज भोगी ॥ १ ॥ हस्त तयाचा धरुनी चाले ॥ एकांतासी त्याला नेले ॥ वृक्ष जेथिचे गगना गेले | पल्लव पसरले ॥ २ ॥ . ह्मणे शंका सांडी आतां ॥ भ्रतार तूं रे तुझि मी कांता ॥ विचार आतां कसला करितां ॥ रतिसुख ते द्यावें ॥ ३ ॥ दिंडी शास्त्र पढलासी सकळ काय त्याचें ॥ हेंच फळ तं करणार काय साचें ॥ विचार करी तूं कांहिं मनी याचा ॥ कां करितोस तूं भाग अनर्थाचा ॥ १ ॥ साको. मन्मथ अंगी फार चेतला नाहिं तिला तें रुचलें ॥ बळेंच चुंबन घेउन प्रेमें त्यास अलिंगन दिधलें ॥ कर धरून हातीं ॥ झालि पयोधर दाखविती ॥ १ ॥ श्लोक. लोटी तिला तोहि बळेच मागें ॥ सारी तीचा तो कर दूर रागें ॥ ज्ञात्या असें कां करितोसि पाही ॥ विचार याचा करि तूंच कांहीं ॥१॥ ( ज्याचें सुख त्याला, ) या चालीवर. तो नर शंकर रे शंकर रे ॥ नाहीं वृत्तिस चळ रे ॥धृ०॥ पर योषितां एकांती रे ॥ सभाग्य वा तरुणी रे ॥ .: विनवी संग कराया रे ॥ परि नाही वृत्तिस चळ रे॥