पान:संगीत शिवलीलामृत.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत, साकी. द्विज वचनाते पारेसुनि राजा वस्त्र भूषणे आणवी ॥ स्त्री वेष तरी देउनि एका त्यांते जाण्या सुचवी ।। दंपत्य तें जाई ॥ सोमवारी निशी समयीं ॥ १ ॥ दिंडी सकळ प्रमदाची ईश्वरीच पाही ॥ जिची प्रतिमा ह्या महीवरी नाहीं ॥ उर्वशी ही पाहुनी मनी लाजे ॥ रेणुकेची ती कीर्ति तिला साजे ॥ १ ॥ तिला पाहुनि तो मदन होइ वेडा ॥ मनी हांसे ती बनि असा जोडा ॥ हर भवानी तैं असें मनी भावी । पुजुनि त्याते ती शीर पदी ठेवी ॥ २ ॥ पंच पक्कानें देइ भोजनासी ॥ वस्त्र भूषण ते अमुप दिले त्यांसी ॥ गौरिशंकर मानुनी नमी त्यांते ॥ पुढे होऊनी तया बोळवीते ॥ ३ ॥ श्लोक. (शिखरिणी.) पथीं कांता मागें पति पुढति चाले परतुनी ॥ वदे कांता तेव्हां मदन शर हा त्रासवि मनीं ।। प्रिया आतां वर्षी सुरत घन तूं काय बघसी ॥ खरी कांता झाले पुरुषपण तें नाहिं मजसी ॥१॥ श्लोक. चेष्टा अशा कां करितोस मित्रा ॥ ठावें नसें कां तुज ब्रह्मपुत्रा ॥ स्त्री वेष सारा करि दूर आतां ॥ चेष्टा नको तूं करुं मार्गि जातां ॥१॥ साकी पतिच्या बोला ऐकुनि झाली मच्छित तेव्हां कांता ॥ महविरति तें अंग टाकुनी बोले धांवा नाथा ॥ कामज्वर भाजी ॥ युक्ती काहिं तरी योजी ॥ १ ॥