पान:संगीत शिवलीलामृत.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सातवा. माझे मनिचा एक भाव तो तुझी पूर्ण करावा ॥ नैषध देशी जाउनि तुह्मी चित्रांगदाचे पहावा ॥ पत्नी त्याची ती ॥ आहे विख्यात त्रीजगतीं ॥ ३ ॥ शंकर पार्वति स्थापुनि नियचि दंपति पूजिति भावें ॥ एक पुरुष तो एक नारि तरि होउनि तुझी जावे ॥ तुझा पुजिल ती ॥ देइल अलंकार वरती ॥ ४ ॥ तेथुन यावें परतुन मग मी देइन यथेष्ट धन तें ॥ जनक जननिचे तसें गुरूचे मानावें वचनाते ॥ तेव्हां द्विज सुत ते ॥ झाले नृपासि हो वदते ॥ ५ ॥ पद (यक्ष वदे हा देव कशाचा, ) या चालीवर. काय नृपा तूं हे वदतोसी निंद्य कर्म ते करण्याला ॥ स्त्री वेष तरी पुरुषा देतां सचैल करिती स्नानाला ॥ जन्मो जन्मीं तो स्त्री होई जो घेई त्या वेषाला ॥ ऐशा वेषा पाहति नर जे जाती ते तरि नरकाला ॥ दश ग्रंथ ते आह्मी पढलों ना करुं ऐशा काला ॥ विद्या लक्ष्मी सतेज आहे तोषवू साऱ्या भूपाला || चरणांवज ते आमुचे नमुनी देतिल धन बहु आझांला ॥ विद्वानांची विद्या जननी देते इच्छित वस्तूला ॥ जनक जननिहुनि विद्या मोठी संकाट रक्षी ती त्याला ॥ विद्याहिन तो पशुसम जाणा जिवंत असुनी तो मेला ॥ न पाहवें तें मुख तरि त्यांचे दिधला श्रम का जननीला ॥ १ ॥ (शंकित का होस ) या चालीवर. मान्य करा वचना ॥ द्विजांनो ॥ धृ० ॥ गुरु वचनाते मान्य करावें करूं नये अवहेलना ॥ जरि कराल मम इच्छा पूर्णहि देइन धन ना गणना ॥ स्तब्ध असें कां बसला तुझी होय कां तरि ह्मणाना ॥ संकट जाणुनि द्विज सुत ह्मणती मान्य करूं तव वचना ॥ १ ॥