पान:संगीत शिवलीलामृत.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत अध्याय ७ था. श्लोक किशोर शशिशेखरा परम पावना मंगळा ॥ भुजंग धरशी हरा वसति रुंडमाळा गळा ॥ रमाधव सदां तुला स्मरतसे भुताधीपते ॥ अविद्य वन जाळेरे जयजया जगाच्या पते ॥ १ ॥ - साकी षष्ठाध्यायों अति निरमळ जी सिमंतिनीची लीला ॥ यथा मतीने वर्णन केली होवो प्रिय तो सकळा ॥ शंभू प्रसन जरो || काय एक नच होय तरी ॥ १ ॥ विदर्भ नगरों वेदमित्र या नामें ब्राह्मण होता ॥ सारस्वतही. मित्र तयाचा जाणति साऱ्या ग्रंथा ॥ दोघांसहि होते ॥ दोन पुत्र बहू जाणते ॥ २ ॥ दिंडी. वेदमित्राचा तनय सुमेधा हो ॥ तया मित्राचा सोमवंत की हो ॥ उभयतांचा स्नेहही कार होता || पहाति दोघेही साग्र दशग्रंथा ॥ छंद शिक्षा तो आग संहिताही ॥ पद क्रन निवंट कप ब्राह्मणेहो ॥ शिक्रात मागुति ज्योतीब साग्र ग्रंथा ॥ लणति व्याकरणहि पूर्ण दशग्रंथा ॥ साकी. दोघांची ही विद्या बबुनी वडिल ह्मणति ते आतां ॥ विदर्भ देशी जाउनि तुह्मीं भेटावें नपनाथा ॥ विद्या ती दावा ॥ अमित धना तरी मिळवा ॥ १ ॥ ब्रह्मपुत्र ते नृपा भेटती जाउनि विदर्भ देशी ॥ उघडे करुनी विद्या धन तें दाविति सारे त्यासी ॥ आनंद भूपाला ॥ पाहुनि त्यांच्या विद्येला ॥ २ ॥