पान:संगीत शिवलीलामृत.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृन. साकी. ब्रह्मानंदें भरली सृष्टी सुमन वृष्टि सुर करिती ॥ नगरामाजी जामासाला मिरवित मग ते नेती ॥ विवाह तो केला ॥ देवा अद्भुत तुझि लीला ॥ १ ॥ चित्रांगद तो सिमंतिनीला एकांती मग बाही ॥ . पाताळांतिल अद्भुत रने घालीं तिच्या हो देहीं ॥ सगंध तैलें ही । लावि तिच्या सुंदर देहीं ॥ २ ॥ मृत्युलोकिं ज्या अपूर्व वस्तू ऐशा दिधल्या श्वशुरा ॥ देवासहि जी दुर्लभ वस्तू काय मिळे इतराला ॥ चित्रवर्म नपती ॥ झाला आनंदित चित्तीं ॥ ३ ॥ सासु श्वशुरा चरणी माथा सिमंतिनी मग ठेत्री ॥ सौभाग्योदधि भरुन चालला करो शुभचि ती देवी ।। सून सुनू घेई ॥ देशा इंद्रसेन जाई ॥ ४ ॥ अवनीचे ते नृपति मिळूनी छत्र देति पुत्राला ॥ राज्यभार तो पुत्रा अर्मुनि इंद्रसेन मग गेला ॥ जप तप करण्याला ॥ अति शिवपदास तो गेला ॥ ५.. सिमांतिनीला आठ पुत्र ही पितया समान झाले ॥ दहासहस्त्रचि वर्षं पाही निर्विन राज्य केलें ॥ नळा समचि भासे ।। न्यायाने तो वर्ततसे ॥ ६ ॥ सोमवार ही प्रदोष व्रत तें आचरि प्रेमें करुनी ॥ दंपत्य पूजा नित्य करितसे होइ लीन शिवचरणीं ॥ सूत सांगताती ॥ शौनक ते श्रवणचि करिती ॥ ७ ॥ पद. ( झाली ज्याची उपवर. ) या चालीवर. सिमांतनीची कथा तरी ही ॥ श्रवण करूनी प्रचिती पाही ॥ धृ०॥ नियमाने ज्या स्त्रिया ऐकिती ॥ वद्वी होइल सौभाग्या ही ॥ अंतरला पती येउनि भेटे ॥ विगत धवा ती सधवा होई॥