पान:संगीत शिवलीलामृत.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत, जनक जनाने तो नयनिं देखुनी ॥ धांव घेत तो तोष पावुनी ॥ धावुनी धरी चरण मागुती ॥ नयनिं अश्रु ते फार वाहती ॥ २॥ जननि धांवली पत्र पाहनी ॥ मिाठ गळा तरी घाल जाऊनी ॥ ताष जो तिला जाहला अस ॥ वर्णण्यास ता शक्ति ती नसे ॥ ३ ॥ आर्या कौसल्या मातेला, श्रीरामाच काय भोटेला आला ॥ किंवा रत्न मिळाले, गेलें हरपून तेंचि लोभ्याला ॥ १ ॥ कों जन्मांधास जसें, देव दयेनेंच नेत्र ते यावे ॥ की प्राणांता समयीं, अमत जसे हो मुखांत ओतावें ॥ २ ॥ चित्रांगद पाहानि तो, लावण्यवतिची स्थिती तशी झाली ॥ शिव महिमा मुखि गाई, वर्णन करण्यास मात नसे शकला ॥ ३ ॥ करभार घेऊनि नप, धांवति चित्रांगदास भेटाया ॥ तैसेच पौर जन ते, भेटति त्याला समीप जाउनीया ॥ ४ ॥ द्रोणागिरि आणुन जसे, वायुसुत लक्ष्मणास वाचावल | तैसें वाटें लोकां, त्रिभुवन सारें आनंदमय झाले ॥ ५ ॥ माता पित्यास घेउनि, स्वनगरास जावया पुढे चालें ॥ नैषधपुर तेव्हां तें, शृंगारुन शोभिवंत बहु केलें ॥ ६ ॥ अभंग. आनंदाची वार्ता सांगण्या धांवती ।। चित्रवा प्रती सेवक ते ॥ महाद्वारों येतां मात ती फुटली ।। चहुं कडे झालो वार्ता तीच ॥ १ ॥ चार जाऊनीया रायास सांगती ॥ जामात ते येती तुमचे हो ॥ सेवक जनाची ऐकुनीया वाणी ॥ वाहे नेत्री पाणी राजाच्याहो ॥ २ ॥ समाचार आणिला आलिंगीत त्यासी ॥ आमेत धनासी देई त्याते । रथौं भरोनीया शर्करा वाटती ॥ तोरणे लावीती चहुंकडे ॥ ३ ॥ कोशगृह केलें मोकळं रायाने ॥ बोलत वाणीने ब्राह्मणासी ॥ नेववेल तुलां तितके धन न्याहो ।। सुखापार नाहिं हो माझ्या आतां ॥ ४ ॥