पान:संगीत शिवलीलामृत.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सहावा. साकी. चित्रांगद तो मागुति वदला सकमारे जा सदना ॥ सासु श्वशुर जे बंदों पडले जाउन सांगिन त्यांना ।। ऐकाने त्या वचना | सिमंतिनी गेली सदना ।। १ ।। सख्या बोलती आण वाहनी सत्य पती तो आपला ।। कोण असा हो पुरुष जगों या तव हात धरूं शकला ॥ ऐकनि तव बोला ॥ सद्गद बहु तो मनिं झाला ॥ २ ॥ पद. ( सखे अनुसये, ) या चालीवर. थांबा थांबा तह्मी आतां ।। फोडं नका हो कळली वार्ता ॥ माझे गळ्याची शपथचि आतां ॥ मौन धरावें सदना जातां ॥ सिमांतनोच्या त्या मुख कमळी ॥ सौभाग्य कळा फारचि आली ॥ आनंदाने सदना गेली ॥ कोणा नाहों वार्ता कळली ॥ १ ॥ पद. (सुवर्ण केतको परि जो, ) या चालीवर. मनो वेगिचा वारु आणुनी शृंगारचि त्या केला ॥ सिमंतिनीचा पति वर बसला गेला मग निजनगराला ॥ ५० ॥ जाउाने तेथें उपवान राहे प्रेषी मग तो नागाला ॥ मानवरूपें नाग निवाला जाई शत्रसदनाला ॥ द्वादशसहस्र वळ नागाचे घेऊाने चित्रांगद आला || वाचाल कसें तुझी आतां शरणचि जावें तरि त्याला ॥ भयाभीत तो शत्रु झाला काहिं सुचेना त्या रिपूला ॥ लाव ग्यवति सह इंद्रसेन तो आगुन स्थापा तरि त्याला ॥ हस्त जोड़नी दायाद उभे ह्मणती रक्षा आझाला ॥ माता पित्यास तोष जाहला जेव्हां ऐकात वार्तेला ॥ १ ॥ कामदा. ( या चालीवर.) • घेउनी सवें सैन्य भार तो ॥ भेटण्या निघे इंद्रसेन तो ॥ वाद्य नाद तो भान चालला ॥ पुत्र पाहण्या वेध लागला ॥ १ ॥