पान:संगीत शिवलीलामृत.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगी शिवलीलामृत. दासि मुखें ती वार्ता ऐकुनि कंठ सद्गदित झाला ॥ चित्रांगद तो खाली पाही अश्रु वाहती डोळां ॥ पाहुनि संधी ती ॥ दासि तयाला मग पुसती ॥ ६ ॥ दिंडी. आगमन हे कोठून तरी झालें ॥ वृत्त ऐकाया कर्ण हे तृषेले ॥ हेच ऐकाया इच्छिते शुभांगी ॥ सकळ संशय टाकुनी तिला सांगी ॥१॥ पद. ( होइल कलह ह्मणोनी, ) या चालीवर. श्रवण करी हो बाई ॥ सिद्ध मी पुरुष माझें काई ॥ धृ.॥ तीन लोकिं ते पाही ॥ इच्छित ठायीं गमनचि होई ॥ ऐके मम वचनाला ॥ भत भविष्य ही कळते मजला ॥ पती तुझा तो अझुनी ॥ जिवंत असे हे सत्यचि मानी ॥ तीनचि दिवसा त्याला || आणिन येथे तव भेटीला ॥ सांग नको कोणाला || ध्यानी ठेवी मम वचनाला ॥ सौभाग्याचे गंगे ॥ तेथुन संकट सर्वहि भंगे ।। शिवकृपेनें पाही । सत्यताच मम वचना येई ॥ १ ॥ अंजनीगीत. ऐसें ऐकुनि परम प्रीतिनें ॥ पाहे वदन तें चोर दृष्टिनें । खरें होइ कां कथिलें यानें ॥ केवि घडे हो ॥ १ ॥ मत्य पावला येइल कैसा ॥ आठवि मग ती मनी महेशा ॥ करुणाकर तूं पुराण पुरुषा ॥ नकळे तव लीला ॥ २ ॥ परपुरुष का जरि तो असतां ॥ तरि मजला कां हातीं धरितां ।। स्नेह उपजला माझे चित्ता ॥ परम आप्त वाटे तो ॥ ३ ॥ वाटे अमृत प्राशुन आला ॥ काळें गिळिला पुन्हां वमिला ॥ षडास्यताता तुमची लीला || नकळे कोणाला ॥ ४ ॥ सत्य जरी हे करशिल देवा ॥ अकरा लक्षहि दंपति सेवा ॥ पूजिन त्यांते धरुनी भावा । लाविन वाती त्या ॥५॥