पान:संगीत शिवलीलामृत.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सहावा. कटी मेखळा पाचमण्याची शोभे बहुतचि ती ॥ तेणे झाली धरित्रि हिरवी मग पर धांवती ॥ मुक्ताफळ ती पाहुनि धांवे मराळ खाण्या ती ।। रन रंग तो कीर पाहनो भक्षाया येती ॥ चंदन उटि ती आंगिं लाविली बहू सुगंधित ती ॥ देहोचा तो सुगंध घ्यावा मिलिंदहि धांवती ॥ सुगंध घेउनि नाग देवता तत बहू होती ॥ १ ॥ आर्या. नयनी पाहुनि त्याला, विस्मित बहु ती सिमंतिनी झाली ॥ कांहें सुचेना तिजला, भ्रमचक्री जाण तो सती पडली ॥ १ ॥ तटस्थ होउाने पाही, चित्रांगद तो वरी वरी मख तें ॥ मंगळसूत्र दिसेना, सतिच्या कंठा सदैव भूषवितें ॥ २ ॥ साकी. हरिद्रा कंकु नसें कपाळी ने िनसें अंजन तें ॥ रत्न भूषणें आंग न दिसती तेज रहित ही मुख तें ॥ परि ती शोभतसे ॥ देखनि रंभा लाजतसे ॥ १ ॥ चंद्रकळा ती ग्रहणा समयीं जाते झांकन जैशी ।। चिंताग्नीनं तन तियेची कृशची झाली तैशी ॥ जाउनि तो जवळों ॥ पुसतां झाला त्यावेळी ॥ २ ॥ कोणाली नूं कोण अससिगे मुळीहुनी ते सांग ॥ जन्मा पासुनि वृत्त कळवुनी सांगी आपला भोग ॥ गहिंबर तो येई ॥ वदतां नयनीं जळ वाही ॥ ३ ॥ अञ्धारा श्रवती खाली वाटे गळती धरली ॥ पयोधर तरी लिंग समजुनी भासे मज त्या वेळी ॥ दंत पंक्ती ती ॥ वदतां रला सम दिसती ॥ ४ ॥ सिमंतिनीच्या सख्या सांगती समाचार तो त्याला ॥ । तीनचि वर्षे झााले सखीचा भतार बुडुनी गेला ॥ सासु श्वशुर दोनी ॥ बादं घातले शत्रूनों ॥ ५ ॥