पान:संगीत शिवलीलामृत.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत, देवासहि जी दुर्लभ वस्तू ऐशी येथे आहे ॥ आवडसी तूं मला बहुतची स्वस्थ मानसें राहे ॥ ऐकनि वचनाला ॥ चित्रांगद वदतां झाला ॥ २ ॥ जननी जनका असेल माझा वेध लागला फार ।। एकलाच मी त्यांचे पोटी मजवर सारा भार ।। त्यांचे चरणांची ।। दर्शनेच्छा मनीं साची ॥ ३ ॥ मद्भार्या ती सिमंतिनी हो लावण्याची खाणी ॥ वत्त असे हे परिसनि माझें जाइल जग सोड़नी ॥ दंदशक राजा ॥ लीनचि चरणी दास तुझा ॥ ४ ॥ मम विरहानें जननी माझी करिल फार शोकाला ॥ मज करितां तो प्राण जननिचा असेल नेत्री उरला ॥ प्रसन्न होऊनी ॥ पोहचवी मज नेऊनी ॥ ५ ॥ हिंडी. बोल ऐकुनि संतोष तया झाला ॥ दिव्य वस्तू ही अमित देइ त्याला ॥ नाग संख्या द्वादशसहस्र पाही || शक्ति त्यांची येइरे तुझे देहीं ॥ १ ॥ जयी बाळा पाहसी संकटातें ॥ हाक मारी पावेन तरी तूंते ॥ मनो वेगें जाणार वारु देई ॥ सवें देई तो एक मणी पाही ॥२॥ दिव्य वस्त्रे रत्नहि अमित देई । वर्णवेना तत्तेज मला कांहीं ॥ पर्वता सम मोट ती बांधली हो ॥ राक्षसाच्या दीधली शिरीं ती हो ॥३॥ एक फणिवर संगोंह दिला त्याच्या ॥ क्रमुनि येती बाहेर यमुनेच्या ॥ तीन वर्षे पूर्ण ती तये वेळी ॥ सिमंतिनि ती स्नानास तिथे आली ॥४॥ एकमेका पाहुनी स्तब्ध होती ।। परि न ओळख ती एकमेक देती ॥ . दिव्य रत्ने मंडीत असा पाही ॥ सिमंतिनिच्या येइ हो भ्रांति देहीं ॥५॥ पद. ( जाउं नकारे विषया, ) या चालीवर. बहु तेजस्वी फाण शिरीची मोती होती ती ॥ अवतंसचि तो डोलत राहे त्या भुजे खालती ॥ गजमुक्तांच्या माळा त्याच्या गळा बहु शोभती ॥