पान:संगीत शिवलीलामृत.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सहावा.' . पद, ( भला जन्म हा तुला लाधला, ) या चालीवर. त्याच्या माये पासुनि झाले हे त्रिमुर्ति गुण तरी ॥ सत्वांशे विष्णु निर्मिलावरी ॥ धृ० ॥ रज तम अंशें विरांच रुद्रहि निर्माणाच तो करी ॥ तो शिव आमी भजतो तरी ॥ दाहिदिशा ही त्रिभुवन सारे स्वर्गहि पाताळही ॥ पंच तत्व सरितां सह ही मही ॥ भस्म लोष्ट तें अष्ट धातु ही व्यापुनि जो राहिला ।। भजतो आमी शिव तो भला ।। अष्टादश ही वनस्पतींची बीजे ही व्यापुनी ॥ राही तो स्मरतो आह्मी मनीं ।। शिवनेत्र ते सूचि जाणा ज्याचे मन निशिपती ।। अंतःकरण तें लक्ष्मीपती ॥ द्रुहीण भासे बुद्धि जयाची अहंकार रुद्र तो । हस्त ही भासे पुरंदर तो ॥ ज्याचा दाढा कृतांतची त्या विराट पुरुषचि तो ॥ ऐसा तो शिव आह्मी भजतो ॥ चाल ॥ शिवावयव सारे देवचि दिसती मला ।। एकादशरुद्र ही भजती त्या शंभुला ॥ द्वादश भास्कर ही गाती त्या कीर्तिला ॥ चाल । दासाचा मी दास असे बा कुठवर वर्ण तरी ॥...... असा शिव स्मरतों मी अंतरीं ॥ त्याच्या माये० ॥ ॥ १ ॥ साकी. कद्रुतनुज तो तोष पावला ऐकुनि त्याच्या बोला ॥ क्षेमालिंगन देऊनि त्याला संगें घेउन गेला ॥ दाखवि पुत्राला । पाताळांतिल वस्तूला ॥ १ ॥