पान:संगीत शिवलीलामृत.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ संगीत शिवलीलामृत. घोर भयंकर संकट जरि हे सिमंतिनीवर पडलें ॥ सोमवार व्रत परी कधी ही नाहिं तिने हो त्यजिलें ॥ वर्षे तीन झाली । पुढची गोष्ट कशी घडली ।। ३ ।। पद. (जाउं नकारे विषया, ) या चालीवर. चित्रांगद जै डोहिं बुडाला कालिंदीच्या त्या ॥ नाग कन्यका येउनि तेथे खेळत त्या होत्या ॥ ध्रु० ॥ पाताळी तो त्यांनी नेला अपुल्या सदनाला ॥ नागलोकिंची शोभा पाहुनि तटस्थ तो झाला ॥ नागिाणि पद्मिनि हस्तिनि चित्रिनि शंखिनि नारीला ॥ पाहुनि झाला तल्लिन मनिं तो त्यांच्या रूपाला ॥ आंगीचा तो सुवास ज्याच्या जाई गगनाला ॥ तपस्वि जन ते गुंगुनि जाती पाहुनि वदनाला ॥ पद नखि रुंजी भ्रमर घालिती पाहुनि तेजाला ॥ नवरत्नाचे खडे पसरले चारी बाजूला ॥ स्वर्गाहुनि बहु पाताळीचे होई सुख त्याला ॥ नागराज तो नयनिं पाहुनी चित्रांगद नमि त्या ॥ १ ॥ दिंडी. कोण तूं गा कोठील सांग माते ॥ प्रश्न ऐकुनि सर्व ही सांगि त्याते ॥ मागुती तो प्रश्नची तया केला ॥ तुझि भजतां कोणत्या दैवताला ॥ १ ॥ पद. ( आम्ही नमुं त्याला, ) या चालीवर. सो शिव आझि भजतो आझि भजतो ॥ जो भक्ता सुख देतो ॥धृ०॥ - इच्छेनेच निर्मितो ॥ प्रकृति पुरुष दोघे जण तो ॥ , अनंत ब्रह्मांडे ही ॥ इच्छा मात्र निर्मी पाही ॥ - इच्छा परततां मनीं ॥ टाकी ब्रह्मांडे मोडुनी ॥ - प्रकृति पुरुषा मिळती ॥ जाउनी सारी पंच भुते ती ॥ मग दोघे ही प्रीतीं ॥ आदि पुरुष मिळण्या येती ॥ जो भक्ता सुख देतो ॥ तो सदाशिव आलि भजतो ।। १ ।।