पान:संगीत शिवलीलामृत.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सहावा. पूर्व जन्मीं काय हो पाप केलें ॥ प्रदोषाते मध्येच टाकियेले ॥ शिवदिनी मी अन्न का ग्रहण केलें ॥ सोमवाराचे व्रतचि मोडियेलें ॥२॥ की हरिहराचा भेद मनीं केला ॥ कीर्तनाचा की रंग भंगियेला ॥ पंक्ति भेदचि काय हो तरी केला ॥ साधु संताला दोष लावियेला ॥३॥ काय केला अभिलाष परधनाचा ॥ काय केला अपमान ब्राह्मणाचा ॥ दान देतां दात्यास विघ्न केलें ॥ ह्मणुन माझ्या बाळास काय नेलें ॥४॥ अंजनीगीत. कोणा मुखिचा ग्रास काढिला ॥ गुरु द्रोह मज पूर्वी घडला ॥ . पात्रीं ब्राह्मण जेवित बसला ॥ उठवुनि लावियला ॥ १ ।। हरिण पाडसा विघडचि केला ॥ परिव्राजका दोष लाविला ॥ ह्मणुनि माझें निधान मजला ॥ गेलें सोडूनी ॥ २ ॥ पद. ( व्यर्थ मी मन्मलें,) या चालीवर. काय तो कोपला शंभु तरी ॥ धांवगा पावगा कृपा करी ॥ ध्रु० ॥ राजहंस तो दाखिव मजला ॥ देवा तूं झडकरी ॥ १ ॥ जाऊं पाहती प्राणची माझे ॥ चैन नसे क्षणभरी ॥ २ ॥ तुजाण दुबळी भणंग झाले ॥ राजसा धांव तरी ॥ ३ ॥ शिव शिव शंभो अनाथ नाथा ॥ दीन मी कृपा करी ॥ ४ ॥. साकी. नदी तीर तें सोडुनि आले सर्वाचे ते सदनाला ॥ लावण्यवतिसह इंद्रसेन तो शोक करीताचे गेला ॥ अपुल्या देशाला ॥ रात्रंदिन करी शोकाला ॥ १ ॥ संधी पाहुनि शत्रू येती राज्य हिरावून घेती ॥ घोर भयंकर प्रसंग पाहुनि दोघे पळुना जाती ॥ धरून त्या आणती ॥ बंदिवान त्या मग करिती ॥ २॥