पान:संगीत शिवलीलामृत.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. सेवक जन ते हाक फोडुनी सैरा वैरा पळती ॥ धांवत जाउनि राजाला ते वर्तमान जाणविती ॥ ऐकुनि तो पडला ॥ मूर्छा येउनि धरणीला ॥ ८॥ पद ( नको नको स्त्री संग ) या चालीवर. कैशि वेळ काठिण तरी येइ नपतिला ॥ पाहण्यास नदी तीर पळत चालला ॥ धृ०॥ सिमंतिनी दुःख भरें शोक हो करी ॥ मूर्छनाहि आलि तिला पडलि भूवरी ॥ श्वास रोध होय तिचा पति भयें तरी ॥ ऐसे तिची बनि स्थिति जननी घाबरी ॥ सुखासनी बसवि तिला उचलनी करीं ॥ नदि तीरा सर्व योते धावुनी तरी ॥ सिमंतिनी शोक करी पडत भूमिला ॥ १ ॥ कैशी वेळ० ॥ साको पिता येउनी सांवरि तिजला माता धांवुनि आली ॥ दुःखार्णवीं ती सर्व बुडाली शोर्के विव्हळ झाली ॥ पार न शोकाला || कोण सावरी कोणाला ॥ १ ॥ सिमंतिनीचे रुदन ऐकुनि पशू पक्षिही रडती ॥ डळमळ लागे कुंभिनि तेव्हां पाहुनि शोकाकुल ती ॥ येती ऐकूनी ॥ सासू स्वशुरचि धांवूनी ॥ २ ॥ चित्रांगदाचि जननी तेव्हां शोर्के विव्हळ झाली ॥ . सिमंतिनींचे पाहुनि मुख तें मूर्छा तिजला आली ॥ लावण्यवती ती ॥ सकळहि तिजला सांवरती ॥ ३ ॥ मत्तिकाच हो मुखी घालनी गडबड धरणी लोळे ॥ काय पाप हो मी तरि केले त्याने बालक गेलें ॥ यमुना नदि झाली ॥ काळाचे आह्मा या वेळीं ॥ ४ ॥ दिंडी माझि अंधाची याष्टि कशी गेली ॥ मला सोडूनी डोहिं कुणी नेली ॥ दाखवा या बाळास एकदां हो ॥ कोणि नेलें चोरून बाळ तें हो ॥१॥