पान:संगीत शिवलीलामृत.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय संहावा.. औदार्य हुताशन तो, दरिद्र काननचि टाके जाळून ॥ धन मेघ बर्षतांचि, दरिद्र धुरोळाच जाइ बैसोन ॥ ६ ॥ नैषध पुरिचे जन ते, सिमंतिनी वदन पाहती जेव्हां ॥ चंद्रकळा चिरुनि जणू, दंत ओतिलेच वाटले तेव्हां ॥ ७ ॥ कलंक काटुनि भरल्या, द्विज संधी काय त्या तरी गमल्या ॥ मुर्खिचा श्वास मज गमे, पुष्पाचा तो सुगंध फुललेल्या ॥ ८ ॥ साकी. साडे होउनि नैषध देशी इंद्रसेन तो गेला ॥ सकळ व-हाडी अनुदिन गाती वधुच्या सौंदर्याला ॥ अनुपम तेजचि तें ॥ रूपा न वर्णवें माते ॥ १॥ विजया दशमी दिपवाळी ही आली आहे जवळी ॥ जामाताला ठेवुनि जावें प्रार्थी नृप त्या वेळी ॥ चित्रांगद राही ॥ इंद्रसेन निघुनिच जाई ॥ २॥ श्रीरंग आणि लक्ष्मी समची जोडा सकळा गमला ॥ समयोचित बहु करि उपचारा चित्रवर्म समयाला ॥ चित्रांगद तोही ॥ एक दिनीं मृगये जाई ॥ ३ ॥ .. मगया करुनी श्रमला बहुतचि धर्म येतसे देहीं ॥ नौका सुंदर आणुन तेव्हां लोटवि यमुना डोहीं ॥ घेउनि दासाला ॥ चित्रांगद जाउन बसला ॥ ४ ॥ कालिंदीचे जीवन काळे परम भयानक पाही ॥ या उदकाचा अंत कोणिही कधी घेतला नाहीं ॥ नदी मधे फिरती ॥ वल्ही सेवक आवलिती ॥ ५ ॥ प्रभंजन बहू सुटुनी तेव्हां नोका डळमळु लागे ॥ आक्रोशे ते सेवक वदती देवा धांवा वेगें ॥ कठिण गती आली ॥ कोण पावेल या वेळी ॥६॥ भयाभीत ते होउनि तेव्हां इकडे तिकडे बघती ॥ अकस्मात तो बुडोनि गेली तरणी खाली हो ती ॥ । आकांताचे झाला ॥ अंत नसे त्या दुःखाला ॥ ७ ॥