पान:संगीत शिवलीलामृत.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृन. कांती देही येउनि होते आयुष्य वृद्धी तरी ।। नैवेद्याने भाग्य येतसे लक्ष्मी वाढे वरी ॥ तांबुल दानें सिद्धि होतसें पुरुषार्थाचे चारी ॥ वंदन देई आरोग्याच तें नित्य नमावे तरी ॥ भ्रम नासाया सामर्थ्य असें बा प्रदक्षणे माजों ॥ आठ० ॥१॥ साकी. जपतां साधे महासिद्धि ती होम हवन ते पाही ।। कोशाची ती वृद्धि करितसे संशय यांत न कांहीं ।। किर्तन करितां तो ॥ सांब पुढे उभा राहतो ॥ १ ॥ ध्याने होतें महा ज्ञान ते श्रवणें व्याधी हरते ॥ नत्याचे करितां जन्म मरण ते दूराच होउन जाते ॥ गातां सुस्वर तें ॥ कीर्ती दूरवरी जाते ॥ २ ॥ जय लाभाच तो नित्य होतसे रत्ने अर्पण करितां ॥ ब्राह्मण भोजन इच्छित देई महिमा नच ये गातां ।। ऐसें सिमंतिनी ॥ करि पूजन प्रेम करुनी ॥ ३ ॥ आर्या त्यावरि सुदीन पाहुनि, चित्रांगदास सिमंतिनी दिधली ।। शोभा अपूर्व केली, वर्णन करण्या मती नसे शकली ॥ १ ॥ कुठवर वर्ण तरि मी, होइल उदधी समान तो ग्रंथ ॥ समारंभ तो ऐसा, झाला जो चार दीन पर्यंत ॥ २ ॥ वर दक्षिणा किति दिली, सहस्र अर्बुद असें मनी जाणा ।। अगणित रत्ने दिधली, गणना त्यांची न होय ती कवणा ॥ ३ ॥ वाजी गज शाळा ही, रत्न खचित यान चित्र शाळा ती ॥ प्रेमें अंदण दिधल्या, रायाच्या तोष माइना चित्तीं ॥ ४ ॥ याचक मुखिं पुरे पुरे, किति न्यावे धन आह्मास जाईना ॥ कंटाळति द्विज नेतां, कुठवर नेतिल गृहांत माईना ॥५॥