पान:संगीत शिवलीलामृत.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सहावा.. . पद. ( पिवळि पैठणी ) या चालीवर. वदन तियेचे नयनी पाहुनि रति पति तो लाजतो ॥ देखुनि कटी, हरी ही धांवतो ॥ ४०॥ गमन देखुनी मराळ लपती जाउनि त्या मानसीं ॥ गजर चाले क्षणभर अशी ॥ कुरळ केश ते पाहुनि नयनीं रुंजि घालिती वरी भ्रमर पंक्ति त्या, वर वर तरी ॥ नयनींचें तें पाणी पाहुनि हरिण मनी लाजती जाउन पनी लपुन बैसती ॥ वेणीची ती आकृति पाहुनि भुजंग विवरांतरीं ॥ जाती होउन खिन्नांतरीं ॥ नासिकाग्र तें शुकास लाजवि अधर तो विव- फला ॥ दंत तेज लाजवि डाळिंबिला ॥ चाल ॥ कमंडल तोही भ्रमला कच पाहुनी ॥ तनु सुवास जाई दूरचि दश योजनीं ॥ सूर्यप्रभा होई परती मग लाजुनी ॥ चाल ॥ सुंदरिच्या या रूपा पाहुनि भुलतसे सुरगण तो ॥ किति मणावा धन्य तरी निधि तो ॥ १ ॥ श्लोक इंद्रवजा. वैधव्य येई कथिलें ऋषिनें ॥ वृत्तांत ऐके सखिच्या मुखाने । ऐकून होई बहु दीन वाणी ॥ वाही सदां हो नयनींच पाणी ॥ १॥ पूर्वी असें मी अघ काय केलें ॥ वैधव्य दैवीं तरि नेमियेलें ॥ मैत्रेयिच्या जाउनि आश्रमाला ॥ वृत्तांत सारा कळवी तियेला ॥ १॥ पद . ( वद जाऊ कुणाला शरण ) या चालीवर. सांगा तरि मी जाउ कुणाला शरणचि या समयाला ॥ जो वारिल संकटाला॥ अहो बाई ॥ जो वारिल ॥ ४०॥ सौभाग्याचे वर्धन होण्या पूजू मी कवणा- ला ॥ सांगा तें दासीला ॥ अहो बाई ॥ सांगा तें ॥ १ ॥ मम तात जनना झुरझुरती मनी पाहुन मम दैवाला ॥ कैसा जन्माचे आला ॥ अहो वाइ । कैसा जन्माचे ॥२॥