पान:संगीत शिवलीलामृत.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सहावा. हरि हर भजनीं सदा सर्वदां होता तप्तर फार ॥ बहुत पुत्रही तया जाहले पितया सम जे शूर ॥ नवसचि बहु करितां ॥ झाली त्यास एक दुहिता ॥ ४ ॥ पद (श्रीहरिच्या वेणु नादें ) या चालीवर. स्वरुपाची खाण होती किति वर्णं मी तरी ॥ मुखकमला. पाहुनीया शशि लाजे अंतरीं ॥ स्वर्गीचें तेज वाटें आलें या भूवरी ॥ सुरगणही भुलुन जाती पाहुनि ती सुंदरी ॥ १ ॥ दिंडी. आलि जन्मासी सुंदरीहि जेव्हां ॥ जातकाते वर्णिती विप्र तेव्हां ॥ दहा सहस्र वर्षोंच कामिनी ही ॥ करी तनयाही तुझी राज्य पाही ॥ १ ॥ बोल ऐकुनि रायास तोष झाला ॥ धनें वसने दीधली त्या द्विजाला ॥ सिमंतिनि हें ठेविलें तिचे नाम ॥ तिचे रूपा पाहुनी भुले काम ॥ २॥ जेंवि विषबिंदू पडे अमृतांत ॥ तेवि वदला विप्र तो अकस्मात ॥ वर्षि चवदा वैधव्य ईस येई ॥ राव ऐकुनि उद्विग्न फार होई ॥ ३॥ . गमें पडलें वज्रची काय देहीं ॥ कींहि कडकडली वीज शिरीं पाही ॥ वदे मागुति विप्र तो तरी काई ॥ शिव दयेने सौभाग्य वृद्धि होई ॥ ४ ॥ असें बोलुनि विप्र तो गृहीं गेला ॥ जडलि चिंता रायास तये वेळां ॥ हळू हळू ती वाढली राजबाळी ॥ झालि उपवर कन्यका तये वेळीं ॥५॥ पद... (तुंबरी ) परिसुनी गान तियेचें ॥ कोकिळ धरि हो मौनचि वाचें ॥ ४०॥ सुवास अंगी पाहुनि धांवती ॥ कस्तुरि मृग ते रानचि घेती ।। तिजवर जडले पंचप्राण पित्याचे ॥ परिसुनी ॥ १ ॥