पान:संगीत शिवलीलामृत.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. अध्याय ६ वा. . श्लोक. कृपा करि दिना वरी शरण मी तुला ईश्वरा ॥ सदां करितसे तुझें स्मरण मी शिवा शंकरा ॥ नयेत श्रवणीं कसें अजुन तें तुझ्या हे हरी ॥ दया करुनि बा मनीं झडकरी मला उद्धरा ॥ १ ॥ पद. (भला जन्म हा तुला,) या चालीवरं. जय जय मदनांतक मनमोहन मद मत्सर दहना ॥ हे भवभयपाशं निळं. तना ॥धृ० ॥ भवानिरंजन भवहारक तूं मस्तकिं गंगाधरा ॥ कर्पुरगौर हे त्रिपुर हरा ॥ नीलग्रीवा सुहास्य वदना नंदीवहनेश्वरा ॥ अससी अमित भक्त प्रियकरा ॥ दानवदमना दयानिधे बा त्रिताप दूर करी ॥ सदोदित आहे लीन तरी ॥ चाल ॥ नित्य शांत अससी गुण वदवेना तरी ॥ दशशत वक्र तो चकित हो अंतरी ॥ एकवार घ्याहो नाम नको दिन भरी ॥ चाल ॥ जें जें इच्छित असेल मानसिं पुरविल तो कामना ॥ जरि भजाल नित्याचे त्रिलोचना ॥ १ ॥ साकी. सोमवार शिवरात्र प्रदोषहि आचरती जे प्राणी ॥ अंती ते हो शिवपदि मिळती पाळा प्रेमें करुनी ॥ कोण असा तरला ॥ सांगे सुत शौनकाला ॥१॥ जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा आर्यावर्ती ॥ चित्रवर्म या नामें करुनी होता प्रतापि नपती ॥ प्रजा जना वरती ॥ पुत्रवत करितसे प्रीती ॥ १ ॥ दुष्ट दुर्जना काळा सम तो प्रयत्निं भगीरथ जैसा ॥ वायुसुता सम शक्ती अंगीं समरौं भार्गव परिसा ॥ कर्णासम दाता ॥ थकले याचक धन नेतां ॥ ३ ॥