पान:संगीत शिवलीलामृत.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय पांचवा, दहासहस्त्राच वर्षे केलें राज्य सुखाने पाही ॥ सुदत्त पुत्रा राज्य देउनी शिव पद सेवित राही ॥ विमान तों आलें ॥ शिवपदि सर्वचि ते गेले ।। ७ ।। अंजनीगोत. दिव्य देह तो त्यांना येई ।। शिव नामातें ध्याती हृदयीं ॥ लोटांगण ते घालति पायीं ॥ पतित पावनाच्या ॥ १ ॥ (भला जन्म हा,) या चालीवर धर्मगुप्ताचे आख्यानातें नियचि जे वाचिती ॥ त्या रक्षिल तो जगत्पती ॥धृ०॥ सकल पापही नाश पावुनी विजयी तो दिसतसे ॥ धनधान्या वृद्धी ही होतसे ॥ प्रदोष महिमा अद्भुत मोठा प्रेमें जो आचरी ॥ मृत्युचे भय मग कोठुनि तरी ॥ शिवलीलामृत ग्रंथ ठेवि जो नियचि अपुलें घरीं ॥ शिवपद प्राप्तच होइल तरी ॥ चाल ॥ हा ग्रंथचि जाणा आम्रवृक्षापरी ॥ पद रचना त्याची फळे समजा अंतरीं ॥ कुतर्क वादि ते जाणा वायस तरी ॥ चाल ॥ आम्रफळ तें तया नावडे विष्टा ते भक्षिती ॥ तयाला कशी मिळावी गती ॥ १ ॥ __ अंजनीगीत. श्रीमद्भिमातटीं राहुनी ॥ भक्त रक्षणा जासि धावुनी ॥ मंदमती मी बुद्धी देउनी । लीला वदवी पुढें ॥ १ ॥ पद. ( तें मन निष्ठुर कां केलें ) या चालीवर, निज पद सत्वर मज दावी ॥ भव भय सारे जे पळवी ॥ धृ०॥ चांडाळीला निज पार्दै नेलें ॥ ती कृपा मज दावी ॥ व्याधासम मी पातकि आहे ॥ कृपा मनी ठेवी ॥ रात्रंदिन हा दास विनवितो ॥ कृपा न कां यावी ॥ चरण रजाचा दास तुझा मी ॥ आतां कृपा व्हावी ॥ निज० ॥१॥