पान:संगीत शिवलीलामृत.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृन, पद. ( देव स्त्री मेनका ) या चालीयर. स्वर्गीच्या या अमोल वस्तू विहिणिस देई तो ॥ ॥ लक्ष रथ दहा सहस्त्र गजही वाजीसह देतो ।।। अक्षय भाते दास दासिही अक्षय कोशचि तो ।। दिव्य चापही अपार सेना शक्ती वरी देतो ॥ बलिष्ट सेनापति ही दिधला त्याच्या संगें तो ॥ मत्कन्याही सांभाळावी सांगुनि जाई तो ॥ १ ॥ साकी. सुखासनी ती अंशुमती ही पतिसह बैसे जेव्हां ॥ सुवर्ण दंड ते घेउनि सेवक पुढे धांवती तेव्हां ।। वाद्ये वाजविती । सेवक जयघोषाचे करिती ॥ १ ॥ विदर्भ नगरा वेढा दिधला जाउनि गंधर्वानी ।। सयरथाला ज्याने वधिले दमला फाराचे लदुनी ।। परि तो नच टिकला ॥ शेवटि जो शरणचि आला ॥ २ ॥ दुर्मर्षण तो जिताचि धरुनी आणति राया पुढती ॥ सत्यरथाला याने वधिलें सूडाचे घ्यावा ह्मणती ॥ धर्मगुप्त बदला ॥ शरणागत योग्य अभयाला ॥ ३ ॥ सुदीन पाहुनि धर्मगुप्त तो राज्यासानं मग बैसे ॥ शांडिल्य गुरुची पूजा करनी शत पर्यो अर्पितसे ॥ दार्भिक्ष ते पाही ॥ राज्यांत कोठे मग नाहीं ॥ ४ ॥ देश देशिचे नृपती येती घेउनि करभाराते ॥ उचितादर तो त्यांचा करुनी अौ वस्त्रे त्याते ॥ याचक सारे ते ॥ देती आशिर्वाद त्याते ॥ २ ॥ यौवराज्य तें शुचिव्रताला देउनि राज्याचे केलें ॥ अंशुमतीसह पाहुनि त्याला जन आनंदित झाले ॥ दुःखित कोण नसे ॥ आनंदित जन सर्व दिसे ॥ ६ ॥