पान:संगीत शिवलीलामृत.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय पांचवा. पद ( गड्यानो घ्या हरिच्या नामा ) या चालीवर. बैसला आसान तो पाही ॥ अंशुमती मस्तक पदिं वाही ॥ धृ०॥ सुहास्य वदन तुझें हे फार ॥ आरक्त ओष्ट सुकुमार ॥ मूर्ति पाहुनि झाले गार ॥ ठेविला तव चरणी भार ॥ तुजविण कोणि मला नाहीं ॥ अंशमती मस्तक० ॥ १ ॥ मानससर हा तूं तरि मला ॥ राजहंसी सेविन तुजला ॥ देखनिया तव मुख कमला ॥ नेत्रमिलिंद तेथें जडला ॥ छळितो मदन ह्या मम देहीं ॥ अंशुमती मस्तक ० ॥ २ ॥ काढनि कंठांतिल ती माळ ॥ घाली नप कंठी तात्काळ ।। ललना झाले मी भूपाळ || ध्या पदरीं करा प्रतिपाळ ॥ इच्छा पूर्ण करावी ही ॥ अंशुमती मस्तक ० ॥ ३ ॥ पद. . ( गजानना दे दर्शन सत्वर, ) या चालीवर. धर्मगुप्त तो तेव्हां बोले ॥ जनक जननि मम स्वर्गी गेलें ॥ राजभ्रष्ट मी दरिद्र आलें । कोविं घडे नकळे गे ॥ १ ॥ अंशमती ती तया बोलली ॥ तिसरे दिवशी परतुनि या स्थळीं ॥ लग्न सिदि ती साधा वेळीं ॥ विसर न व्हावा हो ॥ २ ॥ पित्याला ती सांगे सुंदर ॥ ऐकाने होई हर्षित सत्वर ॥ ह्मणे पावला मज तो शंकर ॥ इच्छा पूर्ण हो ॥ ॥ कामदा. (या चालीवर.) राजपुत्र तो परत येउनी ॥ आग्रजासि ते सर्व सांगुनी ।। गुरुकृपा ह्मणे फळत चालली ॥ उदयकाळिची वेळ रे आली ॥१॥ तीन दीन ते जाहल्यावरी ।। जाति सर्वही त्या चनांतरीं ॥ कोद्रवीण तो तेथं पातला ॥ पाहनी तया तोष जाहला ॥२॥ धाडि छत्र सेना सखासना ॥ त्वरित आणवी विप्र अंगना ॥ चार दीन ते लग्न जाहलें ॥ कांहिं न्यून हो नाहि देखिलें ॥ ३ ॥