पान:संगीत शिवलीलामृत.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामन. दिंडी ब्रह्म सुताते ठेवुनी पुढे चाले ॥ स्वरुप सुंदर पाहुनी मनी डोले ॥ पुढे होउनि प्रश्न तो तिला केला ॥ धन्य वंशचि तव जन्म ज्यांत झाला ॥ १॥ राजपुत्रा विनवूनि दासि बोले ॥ अंशुमति हें नामची ठेवियेलें ॥ कोदविण तो गंधर्व पती पाही ॥ त्याचि कन्या जाहली सुंदरी ही ॥ २ ॥ साकी तव मुख कमला नेत्र मिलिंदाचे रुंजी घालिति पाही ।। तव वचनांबू प्राशन करण्या कर्णचि चातक हेही ॥ ता जागें धन्य खरा ॥ जो वारे ह्या स्वरुप संदरा ॥ १ ॥ गंधर्व पती पुसू लागला जाउनि कैलासाला ॥ अंशमती ही माझी कन्या अपूँ मी कवणाला ॥ महेश मग बोले ॥ ऐका काय तरी कथिलें ॥२॥ सत्यरथाचा सुपुत्र माझा परम भक्तची पाही ॥ धर्मगुप्त तो अशुमती ही त्याला नेउनि वाही ॥ वचन आठवुनि हें ॥ अंशुमती दुरुनाचे पाहे ॥ ३ ॥ - पद . (कारे इतुकी बळजोरी, ) या चालीवर. भासे मदनचि हा बाई ॥ अस्थिर मन होई ॥ धृ०॥ स्वातिल हा चंद्रचि आला कलंक धुवाोन काई ॥ बत्तिस लक्षणि अजानुबाहू चाप शर करिं घेई ।। वक्षस्थळ ते विशाळ बाई करिनायक तो पाही ॥ सखये आतां दुज्यावनाला पुष्पं आणण्या जाई ॥ भासे० ॥ १ ॥ साकी. अवश्य ह्मणुनी ललना गेल्या दुजा वनाला जेव्हां ।। राजसुताला अंशुमती ती खुणावितसे तेव्हां ॥ भुरुह पल्लवाला ॥ पसरुन करी आसनाला ॥ १ ॥