पान:संगीत शिवलीलामृत.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय पांचवा... सार्वजनिक वाचनालय खेड, (पुणे.) साकी शिव पूजा ती घेउं नये बा नच घ्यावे त्या तीर्था । प्रसाद घेतां ब्रह्म वधाचे पापचि येई माथा ॥ .. महत्पापचि ते ॥ शिव पुजा भंगितां होतें ॥ १ ॥ प्रदोष महिमा सांगुनि ऐसा उपदेशी मग त्यांना ॥ उमे सहित ते राहुनि तेथें पूजिति गिरिजा रमणा ॥ गुरुनें जें कथिलें ॥ तसेंच पूजन तें केलें ॥ २ ॥ / चार मास ते प्रदोष व्रत हे प्रेमें अचरण करिती ॥ कुदीन सारे लया जाउनी सुदीन तरि ते येती ॥ व्रत महिमा तोही ॥ त्वरित फळ देतसे पाही ॥ ३ ॥ शुचिव्रत् नामें ब्रह्म पुत्र जो एक दिनीं तो गेला ॥ नदिचे तीरी खेळायाला तेथे लाभचि झाला || दरडी ढासळतां ॥ द्रव्यघट होय सांपडतां ॥ ४ ॥ गृहासि आला घेउनि घट तो माता पाहुनि बोले ॥ प्रदोष व्रताचा महिमा हा की ऐश्वर्यचि तें चढलें ॥ धर्मगुप्त तूं ही ॥ अर्ध भाग घे या समयीं ॥ ५ ॥ नच घेई मी विभाग बंधो धन जें सारें आहे ॥ अवनीमध्ये माझे तरि ते विचार करुनी पाहे ॥ शिव ध्यानाच करिती ॥ नामावळि ते मुखि गासी ॥ ६॥ बन विहार तो करण्यासाठी एकवार ते गेले ॥ गायक कन्या येउनि तेथें सख्यासहित ती खेळे ॥ . पाहुनि ती नयनीं ॥ धर्म गुप्त गेला भुलुनी ॥ ७ ॥ पद. (हरिण किशोर चंचल, ) या चालीवर. परदारा ती नयनि न पाही ॥ दर्शन घेतां भ्रांती देही ॥ ४० ॥ करितां स्पर्शचि बल तें जाई ॥ नरक साधना मार्गचि होई ॥ विचार करुनी - तिकडे पाही ।। पर० ॥१॥