पान:संगीत शिवलीलामृत.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत.. भार्गाव गायी मधुर स्वराने अंबुज संभव ताल धरी तो ॥ नृत्य गती ती पाहुनि नयनीं मृदंग वाजवि जनार्दन तो ॥ प्राणमित्र जो कुवेर तोही हस्त जोडुनी उभा राहतो ॥ प्रदोषकाळिचा ऐसा महिमा निगमागमाहि अगोचर तो ॥१॥ (ऐकुनि तव मधुरगान ) या चालीवर. पक्षशनी प्रदोष असे दोन हो तरी ॥ ध्रु०॥ त्रयोदशी दिनों तरी व्रतचि आचरी ॥ निराहार असुनि दिनी सुकर्म ते करी ॥ तीन घडी रजनि तरी जाहल्यावरी ॥ करि आरंभ पूजनास भक्ति अंतरीं ॥ १ ॥ पद (घेउनि मुशाफर वेश, ) या चालीवर. गोमय घेउनि भूमि सारवी मंडप उभवी वरी ॥ ४०॥ कर्दळि स्तंभहि इक्षुदंड ते आणुनि लावी वरी ॥ रंगित माळा वरी सोडुनी शोभवि नानापरी ॥ शुभ्रवस्त्र ते आपण नेसुनि भस्म चचि ते शिरीं ॥ लिंग स्थापना मधे करूनी पूजन मग तें करी । प्राणायामहि करुनि मागुती न्यासमातृका तरी ॥ दक्षिण भागी स्थापि मुरांतक अग्नी सव्या वरी ॥ वीरभद्रतो गजाननही अष्टसिद्ध त्या तरी ॥ अष्ट भैरव अष्टदिक्पालही स्थापी मग झडकरी ॥ चाल ॥ सप्तावरणी ती शिवपूजा मग करी ॥ राजोपच्यार ते अी लिंगावरी ॥ कार ध्यान शिवाचे भक्तीने अंतरीं ॥ चाल || जय जय गौरीनाथ निर्मळा पूर्ण ब्रह्म तूं तरी ॥ सञ्चिदानंदा जगद्गुरू तूं कृपा दिनावर करी ॥ गोमय ॥ १ ॥