पान:संगीत शिवलीलामृत.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भध्याय पांचवा. पद. (शंकित का होसि ) या चालीवर. एके तूं आतां ॥ बाइगे ॥ ४०॥ सत्यरथ नामें जनकचि याचा पूर्वी तो नृप होता ॥ प्रदोष समयीं स्नान करूनी पूजी त्या गुह ताता ॥ शत्रूनें तें नगर वेढिले आली ऐशी वार्ता ॥ प्रधान पुढती धावुन गेला झाला तो त्या हंता॥ नृपा जवळि तो शत्रु आणला जाहला शिर छेदितां ॥ मत्त होऊनी भोजन करि तो पूजा परि नच करितां ॥ त्या दोषाने अल्प वयामधिं गेला सोडुनि जगतां ॥ शिव पूजन तें नच सोडावें अंती तुझा तो त्राता ॥ १॥ अंजनीगीत. मातेने ती सवत मारिली || जळीं सवत ती विशी जाहली ॥ पूर्व वैरें ओढ़नी नेली ॥ भक्षी ती तिजला ॥ १ ॥ धर्म गुप्त हा याने कधिंही ॥ शिव व्रताते केले नाहीं ॥ जनक जननी रहितची पाही ॥ होउनि तो पडला ॥ २ ॥ उमा बोलली तेव्हां ऋषिला ॥ मम सत कांहो निधन झाला ॥ काय पाप ते सांगा मजला ॥ ह्मणुनि विनवितसे ॥ ३ ॥ पूर्व जान्मया तुझ्या सुतानें ॥ अमित घेतली दुष्टचि दाने ॥ स्त्रिया भोगिल्या फारच यानें ॥ न पूजि शंकरा ॥ ४ ॥ परान्ने तरी जिव्हा दग्धची ॥ दुष्ट दान तें जाळी हस्तची ॥ मंत्रासी मग शक्ती कैंची ॥ ब्रह्मपण व्यर्थ तें ॥ १ ॥ याच कारणे तुझ्या सुताला ॥ द्रव्य नसें गे कांही याला ॥ ह्मणुनि कदाहि शिव पुजनाला ॥ नच सोडावें ॥ ५ ॥ उमा मग ती बाळक दोन्ही ॥ नेउनि घाली ऋषिचे चरणीं ॥ पंचाक्षर मंत्र उपदेशूनी ॥ प्रदोष व्रत सांगे ॥ ६ ॥ पद (संग घडो मज दंग असो ) या चालीवर. प्रदोषकाळी इंदू मौळी बसवुनि अंबा नृत्य करी तो ॥ ध्रु.॥ · वाद्नेवी ती विणा वाजवी वेणू पुरुहुत वाजवि तरी तो ॥