पान:संगीत शिवलीलामृत.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

__ संगीत शिवालिलामृत. जनक जननि ना बंधु ना तिला ॥ फक्त एकची पुत्र हो जिला ॥ घेउनी कडे मार्ग चालली ॥ वाळ पाहुनी त्वरित धांवली ॥ २॥ दिंडी नाहं केलें हो नाल छेदनाला ॥ कोणि त्यजिलें हो वनीं बाळकाला ॥ . कोण याती धर्म हा कोण याते ।। नेउं किंवा टाकुं या बाळकातें ॥ १ ॥ जाउं कैसे टाकुनी बाळकाला ॥ वृक व्याघ्रादिक भक्षितील याला ॥ स्ती पान्हा दाटुनी फार येई ॥ अश्रु ढाळनि बाळ ते पुढे घेई ॥ २ ॥ यति रुपाने शंभु तो तिथे येई । ह्मणे बाई बाळ हा घरी नेई ॥ महद्भाग्यचि ते तुझें पदारं होतें ।। ह्मणुनि क्षत्रिय पुत्र हा प्राप्त तूं ते ॥ ३ ॥ भणंगासी परिसची प्राप्त जैसा ॥ सुधा बिंदू तो मृता मुखी जैसा ॥ बाळ तैसा प्राप्त. हा तुला झाला ॥ असें बोलुनि त्रिपुरारि गुप्त झाला ॥ ४ ॥ शुचिव्रत हे नाम त्या ब्रह्म पुत्रा ॥ धर्मगुप्तचि ठेविलें राज पुत्रा ॥ कडी खांदी घेउनी भीक मागे ॥ कोणि पुसतां मत्सुताचे असे सांगे ॥ ५ ॥ साको ऐसें हिंडत हिंडत गेली एकचक्र नगरीला ॥ नगरी मध्ये हिंडत असतां पाही शिव सदनाला ॥ तेथें द्विज होते ॥ शांडिल्य पुजि शंकरातें ॥ १ ॥ शिवालयीं ती उमा जाउनी शिव पूजा ती पाही ॥ पूजा पाहुनि तन्मय होई हर्ष मायिना देहीं । पाहुनि पुत्राला । काय ऋषी वदतां झाला ॥ २ ॥ राजकुळी हा जन्म पावुनी रंका परि की भासे ॥ दीन होउनी हिंडत आहे पहा कर्म हे कैसें ।। ऐकान त्या वचना ॥ लागे उमा ऋषी चरणा ॥ ३ ॥ भूत भविष्यचि ज्ञान तुह्माला याची माता कोण ॥ पिता कोणहो ? आहे किंवा पावलाचि तो निधन ॥ सांगा ते मजला ॥ ह्मणुनि प्रार्थितसें ऋषिला ॥ ४ ॥