पान:संगीत शिवलीलामृत.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय पांचवा. आर्या हा एक ते बहूतचि, लढला परि ये प्रसंग तो कठिण ॥ होउनि हतार्य तरी, धारातीर्थीच पावला मरण ॥ १ ॥ नृप पनि गरोदर ती, झाले नवमास पूर्ण ते पाही ।। शत्रू आतां धरतिल, मष्णुनि वनीं पळत गोल हो पायीं ।। २ ।। सकुमार फार होती, कंटक रुततीच ते तिचे चरणीं ॥ दुःसह होउनि ती हो, सूर्छा येऊनि पडतसे धरणीं ॥ ३ ॥ रिपु मागे येतिल या, भीतीने पळतसेच वरवर ती ॥ तेव्हां मज भासे की, ही विद्युल्लताच भूवरी फिरती ॥ ४ ॥ वस्त्राभरणे मंडित, हिऱ्या समचि दंत झळकती वदनीं ॥ रतिपति लज्जित होई, पाहुनि मुखेंदु तो तिचा नयनी ॥ ५ ॥ कर्म गति पहा बुधहो, नृपपत्नि गरोदर हिंडते विपिन् । जीच्या अंगुष्टि कधी, नच पडले उष्णरश्मि, किरण ॥ ६ ॥ वनि हिंडे भासें मज, नैषध पत्नीच काय दमयंती ।। की भिल्लि रुपें हिंडे, पतिच्या शोधार्थ काय हैमवती ॥ ७ ॥ एका वृक्षाखाली, व्याकुळ होऊनि ती पडे धरणीं ॥ कर्मनदी माधं पडली, त्यांतुनि वर काढण्या नसे कोणी ॥ ८ ॥ शत संख्य दास दासी, सदैव असती जिच्याचि सेवेला ।। तीही इंदुमती हो, भूवरि लोळूनि सोसि दु:खाला ॥ ९ ॥ तेक्षाण प्रसत होउनि, दिव्य पुत्र पोटिं तो तिच्या झाला ॥ झाली तुपात परि हो, कोणि नसे जवळ उदक देण्याला ॥ १० ॥ टाकुनि बाळास तिथे, उदकं शोधार्थ दूर ती गेली ॥ शिरली एक सरोवरिं, तो ग्राहें ओढुनी तिला नेली ॥ ११ ॥ कामदा. ( या चालीवर.) बाळ ते रडे एकलें वनीं ।। पातली तिथे एक कामिनी ॥ नाम तें उमा विप्रपात्न ती ॥ विगतधव अशी पातलीच ती ॥ १ ॥