पान:संगीत शिवलीलामृत.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. अध्याय ५ वा. श्लोक ( पृथ्वीवृत्त.) उमापात नगाधिशा स्मर हरा प्रभो ईश्वरा || पिनाकि प्रमथाधिपा गिरिशस्थाणु शंभ हरा ॥ त्रिलोचन महेश्वरा शिवगणाधिपा शंकरा ॥ शिवा शशिधरा तुह्मा शरण मी मला उद्वरा ॥ १ ॥ साकी सदाशिव अशी चार अक्षरें नित्य पठण जो कारतो ।। शिवार्चन जो करी निय तो बहुत जिवा उद्धरितो ॥ प्रायश्चित्तचि तें ॥ सकळ दोष लया नेतें ॥ १ ॥ प्रदोष व्रत तें अचरण करितां सकळ सिद्धिही होते ॥ तुष्टि पुष्टि ती अयुष्य वर्धन संपत्तीही येते ॥ . षण्मासा अंती || मरुव्यथा सकळहि जाती ॥ २ ॥ वर्षा अंती ज्ञान होतसें द्वादश वर्षा भाग्य ॥ व्यास वचन हे असत्य मानेल बंधनास तो योग्य ।। त्याचा गुरु लाटका ॥ कैचें ज्ञान त्या दांभिका ॥ ३ ॥ प्रदोष व्रत हे मृत्यु टाळुनी गंडांतरही निरसी ॥ भक्ती भावे पाळुनि व्रत हे अनुभव कां नच घेसी ॥ इतिहासाचे ऐका ॥ सांगे सूत जो शौनका ॥ ४ ॥ विदर्भ देशी भूप सत्यरथ तेज:पुंजाच होता ॥ शौर्या पाहुनि बंदी जनते थकले कीर्ती गातां ।। परि शिव भजनीं ॥ नव्हता रत तो एक दिनीं ॥ ५ ॥ शाल्व देशिच्या राजाला ते अगणित राजे मिळती ॥ एक होउनी सत्यरथासी युद्ध कराया येती ॥ सप्त दिवस लढले ॥ अद्भुत युद्धचि ते झाले ॥ १ ॥