पान:संगीत शिवलीलामृत.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. गोवाहन तो प्रसन्न झाला गोरसबाळा तुजला ॥ गोविप्रातें स्नेहें पाळी धन्याचे होशिल बाळा ॥ गोपति ते ह्मणती ॥ वरिवरि बाळाते नमिती ॥ ७॥ अभंग राघव चरणीं सदा असे लीन ॥ मुखी करी स्मरण सदोदीत ॥ उमिळाजीवन पडे धरणीला ॥ आणी द्रोणाचला जाऊनीया ॥ सीताशुद्धी साठी उदधी लंघीला ॥ शोध तो लावीला लंकेमधे ॥ ऐसा वायूसूत तेथें प्रगटला ॥ लागती चरणाला क्षोणीपाळ ॥१॥ अभंग. साक्षात् रुद्राचा अवतार पाही ॥ उपदेश देई बाळकाला ॥ शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशी ॥ सांगे मग त्यासी सर्व विधी ॥ मस्तकीं तयाच्या ठावेत तो हस्त ॥ झाला विद्यावंत बालक तो ॥ बाळकाचें नाम ठेवी तो श्रीकर ॥ पुष्पं सुरवर वर्षताती ॥ १ ॥ आठवे पिढी तुझ्या नंद तो जन्मेल ॥ त्याचा पुत्र होईल शेषशायी ॥ जन्मुनीया तेथे मारिल कंसाला ॥ रक्षी पांडवाला गोविंद तो ॥ माण माळेचें तें परतून येती ॥ अवताराची स्थिती तैशी आहे ॥ बोलुनीया ऐसे हारेकुलभूषण ॥ पावे अंतर्धान तेथेंची हो ॥२॥ . अंजनीगीत. रामदूत हा गुरू तुझारे ॥ धन्य धन्य तें भाग्य तुझे रे ॥ काय तुला वा न्यून तरीरे ॥ तूंचि जगीं धन्य ॥ १ ॥ दिंडी . चंद्रसेनाने सकळ भूभुजाला ॥ वस्त्र अर्पनि देत तो निरोपाला ॥ श्रीकरासह मग करी प्रदोषाते ।। नित्य भक्तीने गायि शिवकथेते ॥ १॥ शिवव्रताचा उत्साह कारते नित्य ॥ तं जाती शिवपदा तरी सत्य ॥ श्रीकरासह मग राव उद्धरूनी ॥ आंतं जाती ते शिवपदा मिळूनी ॥२॥