पान:संगीत शिवलीलामृत.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.. अध्याय चौथा. रूप पूर्वीचे सर्व लया गेलें ॥ पद्मिणीचें तें रूप प्राप्त झालें ।।। अलंकारें भूषीत तनू झाली ॥ बालकाने जाऊन जागि केली ॥ २ ॥ शंभुदर्शन घ्यावया शीघ्र चाले ॥ जननि पाही तो नवल दृष्टिं आलें ॥ हृदायं धारेले दृढ तिने बालकाला ॥ ह्मणे बाळा चल जाउं दर्शनाला ।। ३ ॥ ह्मणे माता धन्य तूं शिव दयाळा ॥ धन्य बाळक हा तुझा भक्त झाला ॥ गेलि सांगाया धावुनी नृपाला ॥ राव धांवे भेटण्या बाळकाला ॥ ४ ॥ .. शंकराची अद्भूत कराण ही हो ॥ फार आश्चर्यचि होय नपालाहो ॥ परिजन ते पाहण्या धांव घेती ॥ कीर्ति ऐकुनि दूरचे लोक येती ॥५॥ साकी. उमारमण हा प्रसन्न तूंते धन्य तुझी बा भक्ती ॥ दृष्ट बुद्धि ती लयास गेली नाहीं यद्धा शक्ती ।। बा चंद्रसेना ॥ आली भोटेस यावेना? ॥ १ ॥ निरोप ऐकुनि राव निघाला प्रधान घेउनि संगें ॥ सकळ नृपाला भेटुनि त्यासी मिरवित आणी वेगें ॥ अवंति नगरी ती ॥ पाहुनि चकितचि ते होती ॥ २ ॥ सप्तपुरिमधे श्रेष्ट उज्जनी रचना दिव्यचि होती ॥ वंदुनि बाळा सदना पुढती लोटांगण ते घेती ॥ शंभू प्रसन्न जरी ॥ काय एक नच होय तरी ॥ ३ ॥ पर्णकुटी ती सुवर्ण होई शत्रू मित्रचि होती ॥ अजिरी तरु ते कल्पवृक्षची होउन इच्छित देती ॥ मकहि पंडित तो ॥ पंगू तो गिरिवरी चढतो ॥ ४ ॥ जन्मांधहि तो रत्न पारखी मूकाहे वक्ता होई ॥ रंकालाही भाग्य येउनी राज्यपदीं तो जाई ॥ सायास न करितां ॥ चिंतामाणे तो ये हातां ॥ ५ ॥ वेदाचाही सार सापडे अध्ययन तें नच करितां ॥ उमारमण तो भेटे जेव्हां सकळ कला ये हातां ॥ सारे त्या नमिती ॥ त्रिभुवान कीर्ती ती जाती ॥ ६॥